Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुहास खामकरची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" ८ ऑगस्टला चित्रपटगृहात

*सुहास खामकरची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" ८ ऑगस्टला चित्रपटगृहात*


*"राजवीर" च्या निमित्ताने सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण*

*साकार राऊत दिग्दर्शित "राजवीर" ८ ऑगस्टला*



गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध  बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा आगामी हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.



अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स,  समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने "राजवीर" चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



"राजवीर" या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहासनं राजवीर ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  सुहास खामकर अर्थातच "राजवीर"चा दमदार  अभिनय दिसतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि सुहास खामकरचं तडफदार व्यक्तिमत्त्व पाहूनच चित्रपटाविषयी आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.