*‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे धडाक्यात पुनरागमन; टीव्ही आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर 1.6 बिलियनचा आकडा पार करून विक्रम मोडला*
_एक जबरदस्त पुनरागमन:‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ने मालिका लॉन्च झाल्याच्या आठवड्यात मालिका बघण्याची वेळ 1.6 बिलियन मिनिटांपेक्षा जास्त नोंदवली_
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या एके काळी भारतीय टेलिव्हिजन गाजवणाऱ्या मालिकेने 29 जुलै रोजी आपल्या दुसऱ्या सीझन सह स्टार प्लस वाहिनीवर धडाक्यात पुनरागमन केले आहे आणि मालिकेला मिळत असलेला प्रतिसाद देखील ऐतिहासिक म्हणावा असाच आहे. मालिका सुरू झाली त्या आठवड्यातच ही मालिका तब्बल 1.659 बिलियन मिनिटे बघितली गेली, यावरून भारतीय मनोरंजन क्षेत्रात या मालिकेची आजही टिकून असलेली लोकप्रियता दिसून येते.
या मालिकेच्या पुनरागमनामुळे प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या आहेत तसेच नव्या पिढीतील प्रेक्षकांना देखील मालिकेने आकर्षित केले आहे. पहिल्या चार दिवसांतच या मालिकेला टीव्हीवर 31.3 मिलियन प्रेक्षक मिळाले आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून आणखी कित्येक लक्षावधी लोकांपर्यंत ही मालिका पोहोचली. केवळ पहिल्या एपिसोडनेच स्टार प्लसवर 15.4 मिलियन प्रेक्षकांना आकर्षित केले. गेल्या काही वर्षात काल्पनिक मालिकेच्या प्रीमियरला मिळालेला हा सर्वात मोठा प्रतिसाद आहे. हे आकडे दर्शवितात की, भारतातील टेलिव्हिजन आणि डिजिटल स्ट्रीमिंगमध्ये झालेले हे आजवरचे सर्वात मोठे GEC फिक्शन लॉन्चिंग आहे.
या मालिकेच्या जबरदस्त पुनरागमनातून ही गोष्ट स्पष्ट झाली की, बदलत्या डिजिटल सवयी आणि पारंपरिक TV पाहण्याच्या वृत्तीची सांगड घालताना प्रेक्षकांना दैनंदिन मालिका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर बघण्याची वाढती भूक आहे. भारतीय प्रेक्षक प्रदीर्घ चालणाऱ्या मालिका कशाप्रकारे पाहतात यामध्ये एक लक्षणीय बदल दिसून आला. आणि सामाईक आठवणी आणि नव्या, समकालीन कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिढ्यांच्या प्रेक्षकांमधील अंतर कमी होण्यास मदत झाली.
*जिओस्टारचे हेड ऑफ क्लस्टर, मनोरंजन (स्टार प्लस आणि भारत, बंगाली, मराठी आणि गुजराती) सुमंतो बोस म्हणाले,* “‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ च्या पुनरागमनाने हे सिद्ध केले आहे की, उत्कृष्ट कहाणीची ताकद कधीच ओसरत नाही. ही मालिका लॉन्च करण्यामागे आमचा दुहेरी दृष्टिकोन होता: भारतातील एका अत्यंत गाजलेल्या मालिकेची जादू, त्या आठवणी पुन्हा जाग्या करायच्या आणि तसे करताना आजच्या प्रेक्षकांना भावेल, त्यांना उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभव देईल असे कथानक गुंफायचे. स्टार प्लसवरील विक्रमी आकडे वेधक कथानकांच्या कालातीत अकर्षणावरील आमचा विश्वास अधिक दृढ करणारे आहेत. या मालिकेचे पुनरागमन हा दोन पिढ्यांना जोडणारा एक सांस्कृतिक क्षण आहे. आणि असा क्षण आम्ही या प्लॅटफॉर्मवर असलेल्या लक्षावधी घरांपर्यंत पोहोचवल्याचा अभिमान आम्हाला वाटत आहे.”
ऑनलाइन या मालिकेचा 17300 पेक्षा जास्त वेळा उल्लेख झाला आहे आणि त्यातील 86% वेळा एक सकारात्मक भाव त्यातून दिसला आहे, मग तो भावनिक गुंतवणुकीमुळे असो, चाहत्यांच्या अपेक्षेमुळे असो किंवा मालिकेतील कलाकारांच्या कौतुकामुळे असो. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या पुनरागामनाने या डिजिटल युगात ठराविक वेळी टीव्हीवर मालिका बघण्याची नव्याने व्याख्या केली आहे आणि विविध प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना एकत्र करण्यासाठी, सहभागी करून घेण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी काल्पनिक कंटेंटची ताकद अधोरेखित केली आहे.
