मुंबईत शिवा’स सलूनची सिल्व्हर जुबली; अंधेरी ईस्ट येथील २५व्या सलूनच्या उद्घाटनास दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री इहाना ढिल्लों यांची उपस्थिती
मुंबईतील लोकप्रिय शिवा’स सलूनने आपली सिल्व्हर जुबली पूर्ण केली आहे. अंधेरी ईस्ट येथे २५व्या फॅमिली सलूनचे भव्य उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री इहाना ढिल्लों, ब्राईट आउटडोअर मीडियाचे योगेश लखानी, अशोक धामंकर तसेच अनेक बॉलिवूड मान्यवर उपस्थित होते. चांदनी बार आणि पेज थ्री सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी फित कापून व नारळ फोडून या शाखेचे उद्घाटन केले. ब्रँडचे संस्थापक व हेअर स्टायलिस्ट शिवराम भंडारी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.
उद्घाटनावेळी मधुर भंडारकर म्हणाले,
“शिवा माझा भाऊ व मित्र आहे. मुंबईत २५वा सलून सुरू केल्याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांची मेहनत व जिद्द कौतुकास्पद आहे. लवकरच ५०वा सलून सुरू करून गोल्डन जुबली साजरी करावी, ही शुभेच्छा. मी जवळपास प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलो आहे आणि मी त्यांचा लकी चार्म तसेच अनऑफिशियल ब्रँड अॅम्बेसेडर आहे.”
बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमात कार्यरत अभिनेत्री इहाना ढिल्लों यांनीही शिवा’सच्या या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. योगेश लखानी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. शिवराम भंडारी यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
ठाण्यातील एका छोट्या न्हाव्याच्या दुकानातून सुरुवात केलेल्या शिवराम भंडारी यांनी आज शिवा’स या ब्रँडअंतर्गत २५ सलून, स्पा व सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांची यशस्वी साखळी उभारली आहे. त्यांचा प्रेरणादायी प्रवास स्टायलिंग ऑन द टॉप या पुस्तकात सांगितला गेला असून यात त्यांच्या संघर्षाची आणि यशस्वी प्रवासाची कहाणी मांडण्यात आली आहे. मुंबईतील शिवा’स सलून हे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट जगतातील मान्यवरांचे आवडते ठिकाण बनले आहे.




