*पिंगा गर्ल्सचा प्रवास 3 वर्षानंतर नव्याने सुरु होणार, नात्यात आलेला दुरावा मिटवण्यासाठी नव्याने सज्ज होणार!*
‘पिंगा गं पोरी पिंगा-Reunion’ 10 ऑगस्ट, एक तासाचा विशेष भाग, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.
*मुंबई ७ ऑगस्ट, २०२५* : ‘कलर्स मराठी’वरील पिंगा गं पोरी पिंगा ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. आता या मालिकेत एक मोठा टर्निंग पॉइंट आला असून तीन वर्षांचा लीप घेत कथानक एका नव्या वळणावर येऊन पोहचणार आहे. वेळ, परिस्थिती, नाती आणि स्वप्नं या सगळ्यांमधून पात्रांच्या आयुष्यात मोठं स्थित्यंतर घडलेलं दिसणार आहे. वल्लरीचं हॉल तिकीट इंदूकडून जाळलं जातं... वल्लरीला घरात कोंडून परीक्षेपासून थांबवण्याचा प्रयत्न करते.
मैत्रिणींचा जबरदस्त पलटवार आणि पुन्हाएकदा पिंगा गर्ल्स एकत्र येऊन सामोरे जातात. दरम्यान घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेरणा अखेर तिला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्नबंधनांत अडकली जाते. श्वेता त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींमुळे व्यस्त आहेत. वल्लरीचें स्वप्नं पूर्ण झाले आहे advocate म्हणून नावं व्हावं, स्वतःचे घरं असावं, आपली सगळी नाती असावीत... पण अजूनही इंदुमती मात्र बदलेली नाहीये पैसा आला, नावं झालं पण अजुनहि मुलं नाहीये म्हणून ती वल्लरीला टोचून बोलतच आहे. पण, या सगळ्यात पिंगा गर्ल्समध्ये दुरावा आला. वल्लरीचे म्हणणे आहे माझं स्वप्नं पूर्ण झाला पण या प्रवासातल्या मैत्रिणी आता हरवून नाही चालणार आणि ती निर्णय घेते या सगळ्यानं एकत्र आणण्याचा. पिंगा गर्ल्सचा प्रवास 3 वर्षानंतर नव्याने सुरु होणार, नात्यात आलेला दुरावा मिटवण्यासाठी त्या नव्याने सज्ज होणार. पहा, ‘पिंगा गं पोरी पिंगा-Reunion’ 10 ऑगस्ट, एक तासाचा विशेष भाग, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.
प्रेरणाचं अजितसोबत झालेलं लग्न प्रेक्षकांनी पहिले. श्वेता आणि मिठुच्या आयुष्यात असा काय बदल झाला असेल ज्यामुळे त्या गर्ल्सच्या संपर्कात तितक्याशा राहिलेल्या नाही. वल्लरीच्या आयुष्यात नवे संघर्ष, नवी लढाई सुरुच आहे. मैत्रिणींच्या नात्यातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर वल्लरी मात्र स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो लग्नानंतर मैत्री टिकते का? मिठू आणि श्वेतामध्ये दुरावा निर्माण झालेला असताना, वल्लरी पुन्हा सगळ्या मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिच्या या प्रयत्नांमुळे ‘पिंगा गर्ल्स’ पुन्हा एकत्र येणार का ? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. पिंगा गं पोरी पिंगा मालिका आता केवळ मैत्रीची गोष्ट राहिलेली नाही, तर प्रत्येक मुलीच्या संघर्ष, स्वप्नपूर्ती आणि एकमेकींसाठी लढण्याच्या जिद्दीची प्रेरणादायक कहाणी आहे. प्रेक्षकांनी आता आणखी गुंतवून ठेवणाऱ्या भागांसाठी सज्ज व्हावं!
तेव्हा नक्की पहा ‘पिंगा गं पोरी पिंगा-Reunion’ 10 ऑगस्ट, एक तासाचा विशेष भाग, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.


