Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मला दडपण निश्चित नाही आहे, मी माझ्या पद्धतींनी नवीन सुरुवात करणार आहे- अभिजीत खांडकेकर*

*मला दडपण निश्चित नाही आहे, मी माझ्या पद्धतींनी नवीन सुरुवात करणार आहे- अभिजीत खांडकेकर*

*अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!*



*झी मराठी* वरील प्रेक्षकप्रिय आणि आजवर अनेकांच्या हसण्याच्या लाटांवर स्वार झालेला *‘चला हवा येऊ द्या’ हा नॉन-फिक्शन परत येतोय आणि यावेळी या हास्ययात्रेचं सूत्रसंचालन करणार आहे आपला लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर!* अभिजीतचा झी मराठीवरील प्रवास हा खूप खास आणि संस्मरणीय राहिलाय. *अभिजीतने आपल्या या नवीन प्रवासाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.* “झी मराठीसोबतचं माझं नातं अगदी माझ्या करिअरच्या सुरवातीपासून आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार या क्षेत्रात आलो आणि आजपर्यंत काम करत आहोत. त्यामुळे झी आणि माझं नातं खास आहे. त्यात चला हवा येऊ द्या सारखा अत्यंत लोकप्रिय अश्या कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं  गेलं तो माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता. मुळात मला निवेदनाची प्रचंड आवड आहे मी ही संधी चॅलेंज म्हणून घेत आहे.




  कारण गेली १० वर्ष ज्या पातळीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे, त्या टप्प्यावरून तो अजून पुढे नेणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. प्रेक्षकांना आधीच्या पर्वा प्रमाणेच या पर्वातुन ही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक अपेक्षा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मला त्याच दडपण निश्चित नाही. आधीच्या कुठल्याच पर्वाच ब्यागेज माझ्यावर नसल्यामुळे मी माझ्या पद्धतींनी नवीन सुरुवात करणार आहे. मी या सिजनसाठी प्रचंड उत्साही आहे. चला हवा येऊ द्या च्या नवीन पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत, आणि त्यांना ही संधी मिळत आहे याचा मला विशेष आनंद आहे. जिथे जिथे ऑडिशन झाली तिथून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्या मंडळींना चला हवा येऊ द्या मंचाचा स्पर्श होणार आहे आणि या निमित्ताने काही नवीन हास्य कलाकार महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्या कलाकारांच्या करिअरला एक दिशा मिळणार आहे. टीम बद्दल सांगायचे झाले तर संपूर्ण टीम सोबतच  माझं बॉण्डिंग फारच छान आहे कारण आधीपासून त्यांना कायम भेटत आले आहे. *श्रेया, कुशल, गौरव, प्रियदर्शन आणि भरत दादा* या सर्वांसोबत छान संवाद होतो आणि आतापर्यंत मी एक प्रेक्षक म्हणून  हे सगळं अनुभवत होतो पण एक निवेदक म्हणून त्या टीमचा भाग म्हणून आणखीन मज्जा येईल.  मला हेच म्हणायचे आहे कि  प्रेक्षक हे आमचे मायबाप आहेत, त्यांच्याकडून इतकीच अपेक्षा आहे कि जितकं प्रेम या आधीच्या पर्वाना दिले, तितकंच भरभरून प्रेम या पर्वाला हे द्यावं. यंदा या पर्वातून महाराष्ट्राला अनेक नवीन हास्यकलाकार मिळणार आहेत. यावेळीच  चला हवा येऊ द्या नवीन प्रकारे सादर होणार आहे, आणि हे नवीन बदल प्रेक्षकांना नक्की आवडतील याची ही काळजी घेतली आहे. माझं हेच म्हणणं आहे कि १० वर्ष प्रेम देऊन या कार्यक्रमाला इतक्या मोठया शिखरावर नेऊन ठेवलं तेच प्रेम आणि आशीर्वाद प्रेक्षकांकडून या पर्वासाठी अपेक्षित आहे.”


*तेव्हा बघायला विसरू नका 'चला हवा येऊ द्या- कॉमेडीच गॅंगवार' २६ जुलै पासून शनि-रवि रात्री ९:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.