Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे प्रेरणादायी सीरीज ‘मिट्टी’ची घोषणा –

 *अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे प्रेरणादायी सीरीज ‘मिट्टी’ची घोषणा – आपला उद्देश, मुळं आणि शेतीविषयक आधुनिक, उद्योजकीय दृष्टीकोन मांडणारी हृद्यस्पशी गोष्ट. ट्रेलर प्रदर्शित!*


*अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे प्रेरणादायी सीरीज ‘मिट्टी’ची घोषणा– आपले अस्तित्व आणि शेतीकडे पाहण्याचा आधुनिक, उद्योजकीय दृष्टीकोन मांडणारी हृद्यस्पशी गोष्ट. ट्रेलर प्रदर्शित!*


~ मिट्टी 10 जुलैपासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयवर मोफत स्ट्रीम केली जाणार 


मुंबई, भारत – 8 जुलै 2025 – आपल्या आयुष्यात वेगवेगळे प्रवास येत असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रवास असतो, जो तुम्हाला तुमच्या मूळ अस्तित्वाकडे, तुमच्या खऱ्या उद्देशाकडे घेऊन जातो, जिथे भविष्य रूजण्याच्या प्रतीक्षेत असतं. अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या अॅमेझॉनच्या मोफत स्ट्रीमिंग सेवेद्वारे मिट्टी या त्यांच्या आगामी, ओरिजनल सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरीजमध्ये जबरदस्त कलाकारांनी काम केलं असून त्यात इश्वाक सिंग, श्रृती शर्मा, दीक्षा जुना, योगेंद्र टिकु आणि अल्का अमिन यांचा समावेश आहे. 



हा ट्रेलर प्रेम आणि परंपरावर आधारित व स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाची प्रेरणादायी झलक दाखवणारा आहे. यातल्या गोष्टीच्या केंद्रस्थानी राघव नावाचा यशस्वी, जाहिरात क्षेत्रात काम करणारा अधिकारी आहे. राघव परत त्याच्या गावी, घरी जातो तेव्हा त्याची दुनियाच बदलते. आजोबांना निरोप देण्यासाठी सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच्या जीवनाचा उद्देश, तिथले लोक आणि एकेकाळी त्याने सोडून दिलेली जमीन यांच्यासह असलेलं नातं परत नव्यानं उभारण्यापाशी येऊन ठेपतो. ही सीरीज ग्रामीण भारताला सलाम करणारी – आपण कितीही लांब गेलो तरी आपल्या पायाखालची मातीच आपल्याला आकार देत असते याची आठवण करून देणारी आहे. 


अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या कंटेंट विभागाचे प्रमुख आणि संचालक अमोघ दुसाद म्हणाले, ‘मिट्टी ही सीरीज भारताच्या ग्रामीण भागाची ताकद आणि प्रेमाला सलाम करणारी आहे. ही गोष्ट फक्त आपल्या मुळांपाशी परत जाण्याची नाही, तर आपल्या स्वतःच्याच प्रवासात गावात क्रांती घडवून आणण्याचीही गोष्ट आहे. मिट्टीमध्ये वेगवेगळ्या भावना, महत्त्वाकांक्षा आणि त्यांचे परिणाम यांचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. अॅमेझॉन एमएक्स प्लेयरमध्ये आम्हाला नाविन्य आणि नव्या युगाची उद्योजकता यांचा संगम साजऱ्या करणाऱ्या आधुनिक भारताची झलक दाखवताना अभिमान वाटत आहे.’


ही सीरीज आणि आपली व्यक्तीरेखा राघवविषयी इश्वाक सिंग म्हणाले, ‘मिट्टीची कथा वाचल्या क्षणापासून मी भारावून गेलो होतो. वैयक्तिक आणि तरीही जागतिक भावना मांडणाऱ्या गोष्टी शोधणं आता दुर्मीळ झालं आहे. राघवच्या प्रवासानं मला आपण यश मिळवण्याच्या नादात विसरून जातो, त्या मूल्यांची आठवण करून दिली. परत आपल्या मुळांशी जोडलं जाणं हे सगळ्यात प्रभावी हीलिंग असतं हे मला या सीरीजच्या निमित्ताने जाणवलं. घरापासून दूर आलेल्या प्रत्येकाला मिट्टीची कथा आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे.’


फ्रेशलाइम फिल्म्सचे क्रिएटिव्ह निर्माते आकाश चावला आणि अरूणव जॉय सेनगुप्ता म्हणाले, ‘फ्रेशलाइममध्ये आम्ही कायमच अनोख्या गोष्टी सादर करण्यावर भर दिला आहे. मिट्टीमध्ये भारताच्या ग्रामीण भागात शांतपणे घडून येत असलेली क्रांती पाहायला मिळेल – जिथे उच्चशिक्षित लोक परत आपल्या गावी येत आहेत आणि तंत्रज्ञान व शेतीच्या आधुनिक पद्धतींच्या मदतीने शेतीचा कायापालट करत आहेत. सरकारच्या प्रगतीशील धोरणांच्या मदतीने बदल घडून येत आहे. अर्थात या क्रांतीमध्येही आव्हानं आहेत. मिट्टीमध्ये याच क्रांतीची गोष्ट संवेदनशील आणि खिळवून ठेवणाऱ्या पद्धतीने सांगण्यात आली आहे.’


मिट्टी सीरीजमधल्या भावनांची गुंतागुंत अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. ही सीरीज 10 जुलैपासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयवर मोफत पाहाता येणार आहे. ही सीरीज स्वतंत्र अ‍ॅप, अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रीमद्वारे उपलब्ध केली जाणार आहे. 


Link: https://www.youtube.com/watch?v=9eVnW29V6v0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.