Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अशोक मा.मा. मालिकेच्या मंगळागौर विशेष भागामध्ये वर्षा उसगांवकर यांची एंट्री!*

 *अशोक मा.मा. मालिकेच्या मंगळागौर विशेष भागामध्ये वर्षा उसगांवकर यांची एंट्री!* 


अशोक सराफांसोबत पहिल्यांदाच झळकणार छोट्या पडद्यावर!



 *मुंबई १९ जुलै, २०२५ :* कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत आता अशोक मामा आपल्या सुनेची म्हणजेच भैरवीची पहिली मंगळागौर साजरा करण्याचा घाट घालणार आहेत. सध्या मालिकेत अनिश आणि भैरवीचं लग्न पार पडले असून आता भैरवीची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात अशोक मामा साजरी करणार आहेत. त्यानिमित्ताने या खास भागात ‘कलर्स मराठी’वरील भैरवीच्या सुहासिनी मैत्रिणी म्हणजेच इंदू, वल्लरी, प्रेरणा मंगळागौरसाठी उपस्थित राहणार आहेत. पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत लवकरच प्रेरणाचे देखील लग्न होणार आहे. आणि या मंगळागौरीचे एक खास आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता ‘अशोक मा.मा.’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मालिकेत वर्षा उसगांवकर मंगळागौर सादर करणाऱ्या महिला ग्रुपच्या अध्यक्ष आहेत आणि मामांच्या मैत्रीण देखील. मंगळागौरच्या खास भागात भैरवीसह कलर्स मराठीवरील सुहासिनी पारंपरिक नऊवारी साडीत, गजरा, दाग - दागिन्यांमध्ये सजून सहभागी होताना दिसणार आहेत. पारंपरिक खेळ, नृत्य आणि जल्लोषात भरलेला हा भाग प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या मंगळागौर मध्ये वर्षा ताईंचा खास डान्स परफॉर्मन्स देखील असणार आहे.


आता वर्षा ताईंच्या एंट्रीनं मालिकेच्या कथानकात एक खास वळण येणार हे निश्चित. तेव्हा त्यांची भूमिका नक्की काय असेल ? त्यांच्या येण्याने मालिकेत काय काय धम्माल घडणार आहे हे कळेलच हळूहळू. पहा ‘अशोक मा.मा.' मालिकेचा मंगळागौर विशेष भाग कलर्स मराठीची मंगळागौर ३ ऑगस्ट संध्या. ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.



 *यानिमित्ताने बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या,* “कलर्स मराठी माझ्यासाठी खूपचं लकी आहे असं मी म्हणेन. कारण पहिले बिग बॉस मराठीमधून मी प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि आता अशोक मा.मा. या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेत येणार आहे त्यामुळे खूपच आनंद आहे. आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे मी आणि अशोक सराफ छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. आम्ही दोघांनी मोठा पडदा तर गाजवला आहेच आणि आता छोटा पडदा देखील गाजवायला सज्ज आहोत. मला असं वाटतं मी आणि अशोक सराफ तब्बल १८ - २० वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. अशोक सराफ एक महानट आहे. कारण त्याने अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहे, अतिशय अनुभवी आहे. आणि त्याच्यासोबत काम करताना मला नेहेमीच काहीतरी नवीन सापडलं आहे. त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला सापडत गेले.” आता मालिकेत या दोघांना पुन्हाएकदा एकत्र काम करताना बघायला मिळणे म्हणजे सुवर्णसंधी आहे."



तर नक्की पहा ‘अशोक मा.मा.’ मालिकेचा खास मंगळागौर विशेष भाग कलर्स मराठीची मंगळागौर ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता, केवळ आपल्या कलर्स मराठीवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.