झी टीव्हीवर ड्रीमियत ड्रामाचा नवा शो – 'गंगा माई की बेटियां' ज्यात शुभांगी लाटकर मुख्य भूमिका साकारणार
झी टीव्हीचा आगामी शो ‘गंगा माई की बेटियां’ एक अशा महान, करुण आणि सशक्तिकरणाच्या प्रवासाची कहाणी सादर करतो, जिच्यावर समाजाने फार अन्याय केला आहे, पण तरीही ती स्त्री पुन्हा उभी राहण्यासाठी निर्धाराने सज्ज आहे. लोकप्रिय कन्नड शो “पुट्टकाना मक्कळू” वर आधारित या मालिकेत ‘गंगा माई’ची कथा दाखवण्यात आली आहे – अशी स्त्री जिला मुलगा नसल्यामुळे तिच्या पतीने टाकून दिले. विश्वासघात होऊनही ती डोके वर ठेवून जगणे पसंत करते. पालणपोषण करणारी आणि मार्गदर्शक अशी ही स्त्री, प्रेम, ताकद आणि अभिमानाने आपल्या तीन मुलींचा सांभाळ करते. झी टीव्हीच्या ‘आपका अपना ज़ी टीवी’ ब्रँड वचनाचा भाग म्हणून हा शो वास्तवदर्शक आणि भावनिक सत्याचा उत्सव म्हणून सादर केला जातो आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी लाटकर गंगा माईच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही एक अशी स्त्री आहे, जिने औपचारिक शिक्षण घेलेली नसली तरी ती अत्यंत हुशार आणि भावनाशील आहे. ती वाराणसीमध्ये एक छोटीशी मेस चालवते, ज्यातून ती आपल्या तीन मुलींचा सांभाळ करू शकते आणि कुटुंबाला आधार देते. एवढेच नाही तर तिच्या सामर्थ्यामुळे ती संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा ठरते – लोक तिच्याकडून सल्ला घेतात आणि तिला सहजपणे आपले मानतात. तिच्या त्यागामुळे ती फार दुःखी असली तरी, ती आपल्या मुलींना हे विश्वासाने सांगते की, त्यांनी एकत्र राहायला हवे आणि एकमेकांना प्रत्येक संकटात साथ द्यायला हवी. तिचे हे शांत सामर्थ्य, प्रामाणिकपणा आणि मातृत्वाची ऊब हाच या कथेतला भावनिक गाभा आहे.
या भूमिकेबद्दल शुभांगी लाटकर म्हणतात, “जेव्हा मी प्रथम या पात्राचे वर्णन ऐकले, तेव्हा गंगा माईच्या प्रामाणिकपणाने मी खूप प्रभावित झाले. हे पात्र अत्यंत वास्तवदर्शी, साधे आणि उत्तम पद्धतीने कठीण सत्यांना सामोरे जाणारे आहे. मी अगदी लगेचच होकार दिला कारण अशी पात्रे फार क्वचितच मिळतात आणि एका कलाकारासाठी ती खूप समाधान देणारी असतात. मला खरंच आनंद होतो आहे की मी गंगा माईचा प्रवास साकारू शकते आणि प्रेक्षकांपर्यंत तिचे सामर्थ्य पोहोचवू शकते. मी यासाठी खूप उत्सुक आहे.”
‘गंगा माई की बेटियां’ या शोची निर्मिती रवी दुबे आणि सारगुन मेहताच्या 'ड्रीमियत ड्रामा'ने केली आहे आणि हा लवकरच झी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या कथेत प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की गंगा माई आपल्या कुटुंबाला अपार प्रेम आणि निर्धाराने एकत्र कसे ठेवते आणि समाजाच्या निर्णयांवर मात करून आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण कसे बनवते.
धैर्य, करुणा आणि एका आईच्या अढळ जिद्दीची ही कथा पाहायला विसरू नका – फक्त झी टीव्हीवर!