Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक

 मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक

अक्षयपासून दुरावल्यानंतर पाचगणीमध्ये रमाच्या आयुष्याची होणार नव्याने सुरुवात

 

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका मुरांबामध्ये नवा अध्याय सुरु झालाय. मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले. अक्षयने आपली लेक आरोहीसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तर तिकडे रमा पाचगणीमध्ये नवी ओळख बनवू पहातेय.




आतापर्यंत रमाला आपण दोन वेण्यांमध्ये पहात आलोय. पण लीपनंतर रमाचा नवा लूक समोर आलाय. रमाने आता सगळा भूतकाळ मागे सोडून नवीन आयुष्य जगायचं ठरवलं आहे. भूतकाळाशी असणारी नाळ तोडण्य़ासाठी तिने आपल्या दोन वेण्या कापल्या आहेत. रमा पाचगणीतल्या सगळ्यात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे. आधी पेक्षा जास्त खंबीर आणि इंग्रजी भाषेवर कमालीचं वर्चस्व असणारी एक नवी रमा आता जगासमोर आहे. रमा जरी भूतकाळ विसरली असली तरी आपल्या मुलीला मात्र ती कधीच विसरली नाही. लेकीपासून दुरावल्यानंतर रमाने गोड खाणं सोडलं आहे. ती सगळ्यांना गोड़ खायला घालते. पण ती स्वतः खात नाही. आपल्या लेकीला तिने बबडू असं नाव दिलं आहे.

मालिकेच्या पुढील भागांमध्ये रमाची आणि तिच्या लेकीची भेट होणार का? रमा – अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.