*शूटिंगच्या दिवशी सेटवर रक्त! कारण काय? — तुमचाच ओला–सुकं न वेगळा केलेला कचरा!*
रक्त सांडलं. अभिनेत्रीच्या हातांवर खोल जखमा झाल्या. कारण? कोणतं अॅक्शन सीन नाही, कोणतं धाडसी स्टंटही नाही — तर होता तुमच्या घरातून फेकलेला, न वेगळा केलेला कचरा!
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता हणमघर मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्याच्या भूमिकेसाठी खराखुरा कचरा उचलत होती. त्याच ढिगाऱ्यात नागरिकांनी टाकलेले धारदार ब्लेड्स आणि तुटलेल्या वस्तू दडल्या होत्या. त्या हातावर खोल घसरल्या — आणि सेटवर प्रत्यक्षात रक्ताच्या धारा वाहू लागल्या.
पण ही फक्त तिची गोष्ट नाही.
ही आपल्या सर्वांच्या दुर्लक्षाची किंमत आहे.
घराबाहेर टाकताना आपण ओला–सुकं कचरा जर वेगळा करत नाही, तर तो उचलणाऱ्यांचं आरोग्य, जीव धोक्यात येतो. आपण फेकलेला तुटका ग्लास, ब्लेड, बॅटरी, पिन — हे सर्व कुणाच्या तरी हातात भरतात. प्राजक्तावर झालेलं हे खरंखुरं अपघात दृश्य, आपल्यालाच प्रश्न विचारायला लावणारं ठरतं.
या प्रसंगानंतर, चित्रपटाच्या टीमनं शूटिंग थांबवलं आणि परिसरातल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केलं की, ओला आणि सुका कचरा वेगळा करणं ही कायदेशीर जबाबदारी असून त्यामागे माणुसकीही आहे. स्थानिक नागरिकांना योग्य मार्गदर्शन केलं, आणि त्या भागात एक छोटी स्वच्छता मोहिमही राबवली.
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात अशाच खऱ्याखुऱ्या सफाई कामगारांच्या कथा आणि संघर्ष आहे.
हा चित्रपट रविवार, २७ जुलै रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे.
पण चित्रपट पाहण्याआधी… एकदा आरशात बघा,
कदाचित तुमच्या घरचा फेकलेला ब्लेड, कुणाच्या हातावर जखम ठरला असेल.