मोहक मटकरने 'सरु'च्या नव्या लूकबद्दल उघडपणे सांगितले आणि तो अधिक आपलासा कसा बनवला याबद्दलही भाष्य केले!
झी टीव्हीवरील 'सरु' या मालिकेत सरुची भूमिका साकारणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मोहक मटकर आपल्या सुंदर अभिनय आणि ऑन-स्क्रीन मोहकतेमुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पारंपरिक सौंदर्याचे प्रतीक ठरलेली सरुची भारतीय पारंपरिक वेशभूषा तिच्या भावपूर्ण अभिनयाला पूरक ठरते आणि मालिकेच्या कथानकात खरेपणा आणते. तिचा खास लूक, पारंपरिक कपडे आणि दोन वेण्या हे तिच्या ओळखीचे घटक बनले आहेत. आता तिच्या व्यक्तिरेखेच्या परिवर्तनशील प्रवासाचे प्रतिबिंब म्हणून मोहक मटकरचा ऑन-स्क्रीन लूकही बदलत आहे.
राजस्थानातून आलेली सरु ही नेहमीच साधेपणा आणि परंपरेचे प्रतीक राहिली आहे. पण जेव्हा ती धकाधकीच्या, नव्या चेहऱ्यांनी, संधींनी आणि आव्हानांनी भरलेल्या या मुंबईत शहरात येते तेव्हा तिच्या आयुष्याला एक नवा वळण मिळते. या रंगीबेरंगी जगातून वाट काढताना, सरुचा स्वभाव आणि दृष्टिकोन हळूहळू बदलू लागतो. आता तिच्या पोशाखात आधुनिकतेचा स्पर्श असूनही पारंपरिक सौंदर्याचं वलय टिकून आहे. अगदी तिच्या केसांचा स्टाइलही आता अधिक आधुनिक झालेली आहे, तरीसुद्धा तिच्या सांस्कृतिक मुळांचे प्रतिबिंब त्यात जाणवत राहते. या मालिकेत सरुचा हा बदल सुंदरपणे उलगडला जातो — जो केवळ तिच्या लूकपुरता मर्यादित नसून, तिच्या मानसिक प्रवासाची, जिद्दीची आणि प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या वाढीची कथा सांगतो. काळानुसार तिच्या लूकमध्ये बदल झाला असला, तरी तिच्या मूल्यांमध्ये आणि खोलवर रुजलेल्या श्रद्धांमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही, ते अजूनही तिच्या निर्णयांना दिशा देतात.
या बदलाबद्दल बोलताना मोहक म्हणाली, “सरुचा नवा लूक हा तिच्या व्यक्तिरेखेच्या विकासाचे खरेखुरे प्रतिबिंब आहे. मला सर्वात जास्त आवडलं, ते म्हणजे या लूकमध्ये तिच्या पारंपरिक मुळांशी नाते टिकवून ठेवतानाच बदल स्वीकारण्याचा तिचा समतोल दृष्टिकोनही दिसून येतो. एक अभिनेत्री म्हणून नवनवीन लूक्ससह प्रयोग करणे हे नेहमीच रोमांचक असते, पण सरुच्या बाबतीत मी नेहमीच हे पाहिले आहे की तिच्या लूकमध्ये माझ्या वैयक्तिक कल्पनांचाही थोडा स्पर्श असावा ज्यामुळे ती अधिक खरी आणि आपलीशी वाटेल. जेव्हा क्रिएटिव्ह टीमने माझ्यासोबत या बदलाबद्दल चर्चा केली, तेव्हा मी सक्रिय सहभाग घेतला. सरुला काय शोभून दिसेल, ती स्वतःला कसे सादर करेल याचे चित्र मी मनात उभे केले. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी अधिक खास आणि वैयक्तिक झाला. सरुचा हा नवा प्रवास साकारताना जितका मला आवडला तितकाच प्रेक्षकांनाही आवडेल अशी मी आशा करते.”
या रुपांतराद्वारे मोहकने सरुच्या प्रवासाला एक नवे परिमाण दिले आहे, ज्यामुळे तिचा विकास अधिक सुसंगत आणि प्रेरणादायी वाटतो. आगामी भागात अनिका (अनुष्का मर्चंडे) आणि वेद (शगुन पांडे) यांचा साखरपुडा होईल का? की वेदच्या आईला धमकावण्यापासून अनिकाला सरु थांबवू शकेल?
हे जाणून घेण्यासाठी जरूर पहा ‘सरु’ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी टीव्हीवर!