झी टीव्हीच्या ‘छोरियाँ चली गाँव’ मधून ‘जवान’ चित्रपटातील अभिनेत्री रेहा सुखेजा करत आहे आपले रिअॅलिटी टीव्ही पदार्पण!
झी टीव्ही आपल्या आगामी नॉन-फिक्शन शो ‘छोरियाँ चली गाँव’द्वारे एक वेगळा आणि नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहे. या शोमध्ये शहरातील 11 मुलींना थेट ग्रामीण जीवनात नेले जाईल, जिथे त्यांना कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय 60 दिवस गावच्या पद्धतीने रोजचे जीवन जगावे लागेल. या रंजक प्रवासाचं सूत्रसंचालन करत आहे रणविजय सिंघा, ज्याचा दमदार स्क्रीन प्रेझेन्स, निखळ नेतृत्वशैली आणि रिअॅलिटी टीव्हीमध्ये दीर्घ अनुभव त्याला या शोसाठी आदर्श होस्ट बनवतो.
या 11 स्पर्धकांपैकी एक नाव आहे रेहा सुखेजाचे, जी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे, आणि जिचे संपूर्ण पालनपोषण शहरात झाले आहे. हैदराबादची रेहा फेमिना मिस इंडिया 2010ची फायनलिस्ट राहिली आहे आणि त्यानंतर ‘जवान’सारख्या पॅन इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपटातही तिने काम केले आहे. फॅशन आणि चित्रपटसृष्टीच्या झगमगाटानंतर आता रेहा एक पूर्णतः नवे वळण घेत आहे, जिथे ना ग्लॅमर आहे ना प्रसिद्धी, तर आहे फक्त आयुष्याची साधेपणा आणि खरी आव्हाने. ग्रामीण जीवनाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे, तिच्या प्रतिक्रिया खऱ्या आणि नैसर्गिक असतील, ज्या प्रेक्षकांशी थेट जोडल्या जातील. पूर्ण आत्मविश्वास आणि साधेपणासह रेहा आता हिल्स सोडून मातीवर पाय ठेवायला तयार आहे.
या अनुभवाविषयी रेहा म्हणाली, “माझ्यासाठी हा शो खूपच रोमांचक आहे. याची संकल्पनाच पूर्णतः नवीन आहे – शहरातील मुली गावात जाऊन तिथली जीवनशैली आत्मसात करतात. गावकऱ्यांना भेटणे, रोजची कामे करणे — हे सगळे माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. मी कायम शहरातच राहिले आहे. त्यामुळे मला स्वतःलाही जाणून घ्यायचे आहे की मी हे सगळे कसे सांभाळणार. हे गावातले काम शहरात राहून शिकता येत नाही, त्यामुळे मी सध्या माझ्या शारीरिक फिटनेस आणि मानसिक ताकदीवर काम करत आहे जेणेकरून कोणतेही टास्क आले तरी त्याला सामोरे जाऊ शकेन.”
ती पुढे म्हणाली, “रणविजय गेली वीस वर्षं होस्टिंग करत आहे आणि त्याला हे माहीत आहे की कठोरपणा आणि समजूतदारी यांच्यात योग्य तो समतोल कसा ठेवायचा. त्यामुळे असे शो होस्ट करण्यासाठी तो एकदम योग्य आहे. झी टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की हा माझा पहिलाच रिअॅलिटी शो आहे आणि मला तुमचे प्रेम व पाठिंबा हवा आहे. कृपया ‘छोरियाँ चली गाँव’मध्ये मला नक्की पाहा.”
जशी रेहा तिचे शहरी जीवन मागे टाकून ग्रामीण जबाबदाऱ्या आणि सामूहिक जीवन स्वीकारेल, तसतसे प्रेक्षकांना मिळतील काही खरे क्षण, शिकण्यासारखे अनुभव आणि भरपूर प्रेरणा. ही शहरात वाढलेली मुलगी गावाच्या मातीत आपली ओळख निर्माण करू शकेल का? हे तर येणारा काळ आणि टास्कच सांगतील.
पहा झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाँव’ – जिथे गतिमान आयुष्य थांबते, आणि खऱ्या कथा उलगडत जातात .