कोण म्हणतं की कृष्णा श्रॉफ गावातील आयुष्य जगू शकत नाही? पहा ‘छोरियाँ चली गाँव’ मध्ये!
झी टीव्ही आपल्या नवीनतम नॉन-फिक्शन ऑफरिंगसह सज्ज आहे – ‘छोरियाँ चली गाँव’, एक असा रिअॅलिटी शो जो याआधी कधीही पाहिलेला नाही. लोकप्रिय रणविजय सिंघा या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या युनिक फॉरमॅटमध्ये 11 धाडसी, शहरी महिला त्यांच्या गतिमान जीवनशैलीतून बाहेर पडून 60 दिवस एका भारतीय ग्रामीण गावात घालवतील. गॅजेट्स आणि आधुनिक सुविधांपासून दूर, त्या खऱ्या देसी आव्हानांना सामोऱ्या जातील, ज्यामुळे त्यांची ताकद, जुळवून घेण्याची क्षमता आणि आत्मा यांची कसोटी लागेल. हा शो एक प्रेरणादायी, खराखुरा आणि आयुष्य बदलणारा प्रवास देतो, जो याआधी कधीही अनुभवला गेला नाहीये.
या वाहिनीने शोमधील स्पर्धकांची ओळख करून दिली आहे. या सिझनच्या लाइनअपमधील सर्वात लक्षवेधी नावांपैकी एक आहे कृष्णा श्रॉफ – एक फिटनेसप्रेमी, उद्योजिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अॅक्शन स्टार टायगर श्रॉफची बहीण असलेली कृष्णा, पहिल्यांदाच तिच्या आरामदायक आयुष्यातून बाहेर पडून एका भारतीय ग्रामीण गावात अत्यल्प सोयीसुविधांसह राहणार आहे. तिच्या जलद आणि लक्झरी जीवनशैलीच्या बदल्यात, ती गावाच्या साधेपणात आणि आव्हानांत स्वतःला झोकून देणार आहे. ‘छोरियाँ चली गाँव’ या शोमध्ये कृष्णाचा प्रवास तिची शारीरिक सहनशक्ती, मानसिक स्थैर्य आणि अनुकूलतेच्या क्षमतेवर अवलंबून असणार आहे. हा अनुभव कृष्णाचा एक खरा, फिल्टर नसलेला, नैसर्गिक पैलू समोर आणणार आहे – जो तिच्यासाठी परिवर्तन घडवणारा आणि प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
आपल्या सहभागाबद्दल बोलताना कृष्णा म्हणाली, "मी झी टीव्हीसोबत विशेषतः एका नॉन-फिक्शन शोसाठी पहिल्यांदाच काम करण्याबद्दल खूप उत्सुक आहे. ही वाहिनी एक मोठे व्यासपीठ आहे आणि रिअॅलिटी शोजच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. माझ्यासाठी ही एक उत्तम संधी आहे आणि मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परत येऊन प्रेक्षकांशी जोडली जाणार याचा मला आनंद आहे. या शोमधून मला खूप काही शिकायला मिळेल आणि एक व्यक्ती म्हणून मी नक्कीच वृद्धिंगत होईन. रणविजय या शोसाठी अगदी परफेक्ट होस्ट आहे असेही मला वाटते. तो तरुणांशी उत्तम कनेक्ट करतो आणि खरंच स्पर्धकांची काळजी घेतो, वेळ देतो, सर्वांनाच सपोर्ट करतो आणि आम्ही सगळे आरामात आणि सुरक्षित असल्याची खात्री करतो. माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. मला असाच पाठिंबा देत रहा आणि प्रेम पाठवत रहा — तेच माझ्यासाठी सगळं काही आहे. मी नेहमी अशाच निवडी करत असते ज्या तुमच्यासाठी योग्य असतील. रिअॅलिटी शोजमुळे मला माझे खरे रूप दाखवता येते, आणि यावेळी तुम्ही माझी एक अगदी वेगळी बाजू पाहणार आहात."
कृष्णा या वेगळ्या ग्रामीण प्रवासावर निघालेली असताना, ‘छोरियाँ चली गाँव’ हा शो तिच्या केवळ शारीरिक ताकदीचीच नाही, तर तिच्या भावनिक स्थैर्याची आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याच्या क्षमतेचीही कसोटी पाहणार आहे. तिची शिस्तबद्ध मानसिकता, अढळ निश्चय आणि नैसर्गिक प्रामाणिकता यासह, प्रेक्षकांना कृष्णाचा एक असा पैलू पाहायला मिळेल, जो त्यांनी याआधी कधीच पाहिलेला नाही — प्रत्येक काम, प्रत्येक अडचणीतून ती शिकत आणि वाढत जाणार आहे.
पहा झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाँव’ – जिथे गतिमान आयुष्य थांबते, आणि खऱ्या कथा उलगडत जातात!