Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*परफेक्ट कॉम्बो...पावसाची सुरेख रंगत, अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी मनोरंजनाची संगत…*

 *परफेक्ट कॉम्बो...पावसाची सुरेख रंगत, अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी मनोरंजनाची संगत…*



*मुंबई ------   'जून' महिन्याच्या सुरुवातीला जशी पावसाच्या गार वाऱ्याची चाहूल लागते, तसेच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर दर शुक्रवारी मराठी सुपरहिट कंटेंटचा वर्षाव सुरू होतो. दर महिन्यांप्रमाणे या महिन्यातही घरबसल्या एन्जॉय करा नवीन मराठी सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथच्या डब्ड ब्लॉकबस्टर फिल्म्स तेही मराठीत. चला तर मग, जून महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारचा थरारक आणि भावनिक मनोरंजनाने अनुभव घेऊया…


 सिम्बा : अपराध, पर्यावरण आणि प्रतिशोधाची कहाणी

‘सिम्बा’ हा तेलुगु भाषेतील थरारक क्राईम थ्रिलर चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन मुरली मनोहर यांनी केले आहे. ही कथा आहे 'अखिला' नावाच्या एका शाळेच्या शिक्षिकेची, जी एका अनोळखी व्यक्तीचा खून करते. दरम्यान एक पोलीस अधिकारी आणि एक पत्रकार या प्रकरणाचा तपास करत असताना, काही रहस्यमय खून उघडकीस येतात, आणि या सगळ्यांची सूत्रं ‘सिम्बा’ नावाच्या एका पर्यावरण कार्यकर्त्याशी जुळतात. जगातील भ्रष्टाचार आणि त्याविरोधात असलेल्या काही धाडसी व्यक्तींचा संघर्ष या घटनेत जोडला आहे. या साऊथ ब्लॉकबस्टर ‘सिम्बा’ या चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ०६ जून २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.



मॅरीगोल्ड: श्रीमंतीच्या मोहात अडकलेला एक गुन्हेगार

'मॅरीगोल्ड' हा राघवेंद्र नाईक दिग्दर्शित कन्नड थ्रिलर चित्रपट 'कृष्णा' या गुन्हेगाराच्या आयुष्यावर आहे ज्याला श्रीमंत व्हायचं असतं. तो त्याचे मित्र सोनू, गिलकी, सुधी मिळून २०१६ च्या नोटाबंदीत पोलिसांनी लपवलेलं सोनं चोरण्याचा प्लॅन करतात. मात्र, त्यांचा हा प्लॅन फसतो आणि त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यातूनच ते श्रीमंतीच्या मोहात पडतात. या साऊथ चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १३ जून २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार असून, प्रेक्षकांना एक जबरदस्त क्राईम थ्रिलर अनुभवायला मिळणार आहे.


अदृश्यम: एका बेपत्ता मुलीच्या मागे दडलेली गुंतागुंतीची रहस्यकथा

‘अदृश्यम’ हा मल्याळम भाषेतला एक उत्कंठावर्धक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन झॅक हॅरिस यांनी केले आहे. या कथेत ‘कार्थिका’ नावाची तरुणी अचानक गायब होते. नंतर तिचा तपास घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम यांच्या आदेशावरून डिटेक्टिव्ह नंदकुमार या प्रकरणात येतो. या शोधात त्याला राजकुमार या निलंबित पोलिस अधिकाऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळते, ज्यामुळे केसला नवे वळण येते. आणि हे दोन्ही तपास एकमेकांत गुंततात. या चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २० जून २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.


अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "पावसाळ्याच्या गारव्यात प्रेक्षकांचं मनोरंजन अधिक रंगतदार करण्यासाठी आम्ही रोमांचक कथांनी भरलेला दर्जेदार मराठी कंटेंट घेऊन आलो आहोत. शिवाय लवकरच तुमच्या भेटीला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीची ओरिजिनल नवीन वेब सिरीज ‘खोताची वाडी’ येणार आहे जी एक रहस्य, शाप आणि गूढतेने भरलेली कहाणी, जी प्रेक्षकांना नव्याने भय आणि कुतूहलाचा अनोखा अनुभव देईल."



अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप हे गेली चार दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य राहिले आहे. व्हीएचएसच्या काळापासून आजच्या ओटीटी युगापर्यंतचा प्रवास त्यांनी जपलेला आहे. त्यांच्या १५० हून अधिक यूट्यूब चॅनेल्स आणि तीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अल्ट्रा आजही स्थानिक भाषिक कंटेंटसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनले आहे.


अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्याला ४,०००+ तासांच्या समृद्ध कंटेंटसह भावनिक, सर्जनशील आणि दर्जेदार मनोरंजनाचं व्यासपीठ देत आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांबरोबरच यूएसए, यूके, मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतही अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचं प्रेक्षकांशी असलेलं भावनिक नातं अधिक घट्ट होत आहे. आणि याचं प्रमाण म्हणजे ८०% हून अधिक व्ह्यूअर रिटेन्शन रेट.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.