Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आमिर खान घेऊन आले ‘जनतेचं थिएटर’: ‘सितारे ज़मीन पर’ ब्लॉकबस्टर यूट्यूबवर रिलीज करून रचला इतिहास*

 *आमिर खान घेऊन आले ‘जनतेचं थिएटर’: ‘सितारे ज़मीन पर’ ब्लॉकबस्टर यूट्यूबवर रिलीज करून रचला इतिहास*


एका अनोख्या आणि पहिल्यांदाच घेतलेल्या निर्णयात, आमिर खानने आपल्या नवीन चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर थेट यूट्यूब मूव्हीज ऑन डिमांडवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून हा चित्रपट जगभरातील कोपऱ्यापर्यंत स्वस्त आणि सहज पोहोचू शकेल.


हा धाडसी निर्णय चित्रपट प्रदर्शनाच्या पद्धतीला नवीन दिशा देतो. 'सितारे ज़मीन पर' हा चित्रपट केवळ यूट्यूबवर पाहायला मिळेल आणि तो इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार नाही.


आमिर खानने आज घोषणा केली की त्यांचा थिएट्रिकल ब्लॉकबस्टर सितारे ज़मीन पर 1 ऑगस्ट 2025 पासून यूट्यूबवर जगभरात प्रदर्शित होईल. हा निर्णय 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक थेट प्रेक्षकांच्या घरी आणतो. या हृदयस्पर्शी कौटुंबिक ड्रामामध्ये आमिर खान, जेनेलिया देशमुख यांच्यासोबत 10 इंटेलेक्चुअल डिसअॅबिलिटी असलेल्या कलाकारांचाही समावेश आहे. भारतात हा चित्रपट ₹100 मध्ये उपलब्ध असेल, तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर आणि स्पेनसह 38 देशांमध्ये तो स्थानिक किमतींमध्ये उपलब्ध असेल.


2007 च्या क्लासिक तारे ज़मीन पर चा सितारे ज़मीन पर हा स्पिरिच्युअल सिक्वेल मानला जातो आणि तो प्रेम, हास्य आणि समावेशितेचा उत्सव साजरा करतो. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे आणि आतापर्यंत जगभरात ₹250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता प्रेक्षक हे चित्रपट घरबसल्या एक किरकोळ फी भरून यूट्यूबवर पाहू शकतील, ज्यामुळे प्रत्येक घर आणि मोबाइल स्क्रीन बनणार आहे ‘जनतेचं थिएटर’.


या निर्णयामुळे प्रीमियम सिनेमा अधिक लोकांसाठी सहज उपलब्ध होईल – मग ते घरात असोत वा प्रवासात, फक्त इंटरनेट कनेक्शन पुरेसं आहे. ज्यांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहायला चुकवलं आहे किंवा पुन्हा पाहायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांसाठी सितारे ज़मीन पर मध्ये प्रमुख भाषांमध्ये सबटायटल्स आणि डबिंगही उपलब्ध असेल.


यूट्यूबवर रिलीज केल्यामुळे यूट्यूबची व्यापक पोहोच आणि सोपी प्रवेशप्रणाली याचा लाभ मिळणार आहे. आगामी काळात आमिर खान प्रॉडक्शन्सची इतर लोकप्रिय चित्रपटही याच प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहेत.



ही खास भागीदारी दाखवते की यूट्यूब आता थिएटरनंतर चित्रपट प्रदर्शनासाठी एक महत्त्वाचा आणि नविन पर्याय ठरत आहे. यूट्यूबची पोहोच भारतात आणि जागतिक स्तरावर खूप मोठी आहे. कॉमस्कोरच्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील 18 वर्षांवरील 5 पैकी 4 लोक यूट्यूब वापरत होते. आणि जगभरात दररोज यूट्यूबवर 7.5 अब्ज वेळा मनोरंजनाशी संबंधित व्हिडीओ पाहिले जात होते.


लाँचच्या वेळी अभिनेता-निर्माता आमिर खान म्हणाले, "मागील 15 वर्षांपासून मी अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो, जे थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीत, किंवा कुठल्या कारणाने जात नाहीत. आता अखेर तो क्षण आलाय जेव्हा सगळं योग्य प्रकारे जुळून आलं आहे. आपल्या सरकारने UPI सुरू केलं आणि आज भारत इलेक्ट्रॉनिक पेमेंट्समध्ये जगात नंबर 1 आहे. इंटरनेटची पोहोचही भारतात झपाट्याने वाढली आहे. यूट्यूब तर आज प्रत्येक डिव्हाइसवर असतो. त्यामुळे आपण भारतातील दूरच्या भागांपर्यंत आणि जगभरातील लोकांपर्यंतही सहजपणे चित्रपट पोहोचवू शकतो. माझं स्वप्न आहे की सिनेमा प्रत्येकापर्यंत पोहोचावा, तोही योग्य आणि परवडणाऱ्या दरात. जर हे मॉडेल यशस्वी ठरत असेल, तर रचनात्मक लोक सीमा किंवा अडथळ्यांची चिंता न करता विविध कथा सांगू शकतील. नवीन कलाकारांसाठी आणि सिनेसृष्टीत येऊ इच्छिणाऱ्यांसाठीही हे एक मोठं संधी असेल. जर हे यशस्वी झालं, तर सर्वांसाठी फायदेशीर ठरेल.”


यूट्यूब इंडिया चे कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर, गुंजन सोनी यांनी सांगितले, "सितारे ज़मीन पर केवळ यूट्यूबवर प्रदर्शित होणं म्हणजे भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. यूट्यूब आधीपासूनच प्रीमियम कंटेंटसाठी एक मोठं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही निर्मात्यांना फक्त पोहोचच देत नाही, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधीही देतो. आजचं हे लाँच फक्त एका चित्रपटाचं प्रदर्शन नाही – यूट्यूब भारतीय सिनेमासाठी ग्लोबल स्टेजवर रेड कार्पेट अंथरत आहे.”


यूट्यूबवर तुम्ही विविध भाषांमधील आणि विविध प्रकारच्या चित्रपटांना खरेदी किंवा भाड्याने पाहू शकता – यात भारतातील हिट चित्रपटांपासून ते आंतरराष्ट्रीय हिटपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. ही सुविधा सतत वाढत आहे, विशेषतः भारतात, जिथे इंटरनेट वापर झपाट्याने वाढतो आहे, लोक स्मार्ट टीव्हीवर अधिक कंटेंट पाहत आहेत आणि मोबाईलवरही भरपूर व्हिडीओ पाहतात. भारतात गेल्या 5 वर्षांत यूट्यूबवर सर्वात वेगाने वाढलेलं माध्यम म्हणजे स्क्रीन कनेक्टेड टीव्ही (CTV) आहे. हे बदल दर्शवतात की यूट्यूब कसं प्रत्येक स्क्रीनवर आणि प्रत्येक फॉर्मेटवर प्रीमियम कंटेंट पोहोचवण्यात अग्रेसर आहे.


हा प्लॅटफॉर्म आता चित्रपटांच्या संपूर्ण प्रवासाचा भाग बनला आहे – मग ती सुरुवात ट्रेलर, गाण्यांपासून असो, किंवा नंतर चित्रपट पूर्णपणे ऑनलाईन पाहण्यासाठी. एका सर्व्हेप्रमाणे, भारतात जेव्हा लोक नविन चित्रपट किंवा शो पाहण्याचा विचार करतात, तेव्हा ते सर्वप्रथम यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ पाहतात. 94% लोक मानतात की यूट्यूबवर सर्वोत्कृष्ट म्युझिक आणि एंटरटेनमेंट उपलब्ध आहे. जसजसं लोकांचं यूट्यूबशी जास्त कनेक्शन होतंय, तसतसे त्यांच्या आवडत्या कलाकारांभोवती आणि चित्रपटांभोवती फॅन क्लब तयार होत आहेत, ज्यामुळे निर्मात्यांना आपल्या प्रेक्षकांशी अधिक गहिरा संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळते.


आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित आणि दिव्य निधी शर्मा लिखित सितारे ज़मीन पर मध्ये आमिर खान आणि जेनेलिया डिसूजा प्रमुख भूमिकेत आहेत आणि यात 10 नवीन कलाकारांची एन्ट्रीही झाली आहे. आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं, तर आमिर आता लाहौर 1947 (ज्यात सनी देओल आणि प्रीती झिंटा असतील) आणि एक दिन (ज्यात जुनैद खान आणि साई पल्लवी दिसतील) यांचंही प्रोडक्शन करत आहेत. हे दोन्ही चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.