*आमिर खान घेऊन आले 'जनतेचं थिएटर': इतिहास घडवला, ब्लॉकबस्टर फिल्म ‘सितारे जमीन पर’ यूट्यूबवर रिलीज*
एका वेगळ्या आणि ऐतिहासिक निर्णयात, आमिर खान यांनी त्यांच्या नव्या सिनेमाला थेट थिएटर रिलीजनंतर लगेच यूट्यूब मूव्हीज-ऑन-डिमांडवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ही फिल्म जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांपर्यंत सहज आणि स्वस्त दरात पोहोचू शकेल.
हा निर्णय फिल्म प्रदर्शनाच्या पारंपरिक पद्धतीला नवी दिशा देणारा ठरतो. ‘सितारे जमीन पर’ ही फिल्म फक्त यूट्यूबवरच पाहायला मिळणार असून, कोणत्याही इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ती रिलीज केली जाणार नाही.
आमिर खान यांनी जाहीर केलं की त्यांचा हिट सिनेमा ‘सितारे जमीन पर’ 1 ऑगस्ट 2025 पासून जगभरात यूट्यूबवर उपलब्ध होणार आहे. 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला गेलेला हा चित्रपट आता थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. ही भावनिक आणि कौटुंबिक कथा असलेली फिल्म आहे, ज्यात आमिर खान, जेनेलिया देशमुख यांच्यासोबत 10 बुद्धीमंद दिव्यांग कलाकारांचाही समावेश आहे. भारतात ही फिल्म फक्त ₹100 मध्ये भाड्याने पाहता येईल, तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह 38 देशांमध्ये ही लोकल प्राइसिंगसह उपलब्ध असेल.
‘सितारे जमीन पर’ ही 2007 मधील क्लासिक ‘तारे जमीन पर’ ची स्पिरिच्युअल सक्सेसर मानली जात असून, ती प्रेम, हास्य आणि समावेशितेचा उत्सव साजरा करते. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ₹250 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता प्रेक्षक ही फिल्म एका छोट्याशा शुल्कात यूट्यूबवर रेंट करून पाहू शकतील – ज्यामुळे प्रत्येक घर आणि मोबाइल स्क्रीन ‘जनतेचं थिएटर’ बनेल.
या निर्णयामुळे प्रीमियम सिनेमा सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो – घरात असो की प्रवासात, फक्त इंटरनेट कनेक्शन असणे पुरेसे आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची संधी गमावली किंवा पुन्हा पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. ही फिल्म प्रमुख भारतीय भाषांमध्ये सबटायटल्स आणि डबिंगसह उपलब्ध असेल, ज्यामुळे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.
‘सितारे जमीन पर’ ची ऑनलाइन रिलीज यूट्यूबच्या प्रचंड पोहोच आणि सोप्या अॅक्सेसचा फायदा घेते. पुढील काळात आमिर खान प्रॉडक्शन्सच्या इतर अनेक फिल्म्सही याच प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहेत.
ही विशेष भागीदारी दाखवते की यूट्यूब आता थिएटरनंतर फिल्म प्रदर्शनाचं एक महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. यूट्यूबची भारतात आणि जगभरात मोठी पोहोच आहे. कॉमस्कोरच्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारतात 18 वर्षांवरील प्रत्येक 5 पैकी 4 लोक यूट्यूब वापरत होते. संपूर्ण जगभरात दररोज 7.5 अब्जांहून अधिक मनोरंजनाशी संबंधित व्हिडिओ यूट्यूबवर पाहिले जातात.
या लाँचवेळी बोलताना अभिनेता-निर्माता आमिर खान म्हणाले, “गेल्या 15 वर्षांपासून मी याचा विचार करत होतो की अशा लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल जे थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीत. आज अखेर तो क्षण आला आहे जेव्हा सर्व गोष्टी योग्य पद्धतीने एकत्र आल्या आहेत. सरकारने UPI सुरू केलं आणि भारत आता इलेक्ट्रॉनिक पेमेंट्समध्ये जगात क्रमांक 1 वर आहे. भारतातील इंटरनेटची पोहोचही झपाट्याने वाढली आहे. आणि यूट्यूब आता जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसवर आहे. आता आपण भारतातील अनेक भागांपर्यंत आणि जगभरातील लोकांपर्यंत फिल्म पोहोचवू शकतो. माझं स्वप्न आहे की सिनेमा प्रत्येकापर्यंत पोहोचावा — योग्य दरात आणि सुलभ पद्धतीने. हा प्रयोग यशस्वी झाला, तर विविध प्रकारच्या कथा सांगणं क्रिएटिव्ह लोकांसाठी शक्य होईल. आणि हे नवोदित कलाकार व नव्या फिल्म मेकर्ससाठी एक मोठं व्यासपीठ असेल.”
यूट्यूब इंडिया चे कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर, गुंजन सोनी यांनी या भागीदारीचं महत्त्व स्पष्ट करताना सांगितलं, “फक्त यूट्यूबवर 'सितारे जमीन पर' रिलीज करणं, भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठीचा एक मोठा टप्पा आहे. यूट्यूब आधीपासूनच प्रीमियम कंटेंटसाठी एक महत्त्वाचं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही फिल्ममेकर्सना त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या हिशोबाने पोहोचण्यासाठी स्वातंत्र्य देतो. आजचा हा लाँच केवळ एका फिल्मचा डिजिटल रिलीज नाही – यूट्यूब भारतीय सिनेमासाठी जागतिक रंगमंचावर एक रेड कार्पेट अंथरत आहे.”
यूट्यूबवर तुम्ही विविध भाषांमधील आणि विविध प्रकारच्या फिल्म्स विकत घेऊ शकता किंवा भाड्याने पाहू शकता – ज्यामध्ये भारतीय हिट्सपासून ते आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर्सपर्यंत सर्व काही आहे. ही सुविधा भारतात वेगाने वाढत आहे. कारण इंटरनेटचा वापर प्रचंड वाढतो आहे, लोक स्मार्ट टीव्हीवर कंटेंट पाहत आहेत आणि मोबाइलवरही मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ बघत आहेत. भारतात यूट्यूबवर सर्वाधिक वेगाने वाढणारा स्क्रीन प्रकार म्हणजे कनेक्टेड टीव्ही (CTV). या बदलामुळे हे सिद्ध होतंय की यूट्यूब प्रत्येक स्क्रीन आणि फॉरमॅटवर प्रीमियम कंटेंट पोहोचवण्यात आघाडीवर आहे.
हे प्लॅटफॉर्म आता फिल्मच्या संपूर्ण प्रवासाचा भाग बनलं आहे — टीझर, ट्रेलर, गाणी यांपासून सुरुवात होऊन अखेरीस फिल्मच्या डिजिटल प्रदर्शनापर्यंत. एका सर्वेच्या मते, भारतात लोक जेव्हा एखादी नवी फिल्म किंवा शो बघण्याचा विचार करतात, तेव्हा सर्वप्रथम यूट्यूबवरच शोध घेतात. 94% लोकांचं मत आहे की यूट्यूबवरच सर्वोत्कृष्ट संगीत आणि मनोरंजन उपलब्ध आहे. यामुळे कलाकार, फिल्ममेकर्स आणि प्रेक्षक यांच्यात एक घट्ट नातं तयार होतं.
‘सितारे जमीन पर’ चे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केलं असून, लेखन दिव्य निधी शर्मा यांचं आहे. प्रमुख भूमिकांमध्ये आमिर खान आणि जेनेलिया डिसूजा आहेत, तसेच दहा नवोदित कलाकारांचा समावेश आहे. पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये आमिर ‘लाहौर 1947’ (सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासह) आणि ‘एक दिन’ (जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्यासह) या सिनेमांचं निर्मिती करत आहेत. हे दोन्ही चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्स अंतर्गत तयार होत आहेत.