Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विंबलडन फायनल मध्ये सोनम कपूरचा स्टाइल ‘स्लॅम’! पँट सूटमध्ये ग्लोबल लूकने गर्दीतही उठून दिसली!

 विंबलडन फायनल मध्ये सोनम कपूरचा स्टाइल ‘स्लॅम’! पँट सूटमध्ये ग्लोबल लूकने गर्दीतही उठून दिसली!




बॉलिवूड अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन सोनम कपूर हिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, स्टाईल आणि आत्मविश्वास यांचा परिपूर्ण संगम तिच्या व्यक्तिमत्त्वात आहे. विंबलडन जेंटलमेन फायनल्समध्ये तिने उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, आणि तिच्या पोशाखामुळे सोशल मीडियावरही ती चर्चेचा विषय ठरली.


सोनमने राल्फ लॉरेनच्या SS25 कलेक्शन मधील कॉटन पिनस्ट्राइप्स निळा पँटसूट परिधान केला होता — इंग्लिश उन्हाळ्यासाठी अगदी परिपूर्ण निवड. तिने याला राल्फ लॉरेनचा हँडबॅग आणि सनग्लासेस, मनोला ब्लाहनिकचे स्पेशल शूज (जे टेनिस बॉल डिझाइनसह होते) आणि ऑडेमार्स पिगुएचे खास घड्याळ यांच्या सहाय्याने परिपूर्ण लुक दिला.


ही सोनमची विंबलडनमधील चौथी उपस्थिती होती आणि यंदाही तिने आपला प्रेम खेळावर जितकाच आहे, तितकाच प्रेम स्टाईलवर ही आहे, हे दाखवून दिलं. या प्रतिष्ठित स्पर्धेत यंदा केट ब्लॅंचेट, रेबेल विल्सन, रसेल क्रो, एडी रेडमेन, निक जोनस, प्रियंका चोप्रा जोनस यांच्यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.



जानिक सिनर यांनी कार्लोस अल्कराज यांना पराभूत करत पहिल्यांदाच विंबलडन विजेतेपद मिळवले — हा सामना जितका रोमांचक होता, तितकाच सोनमचा फॅशन गेमही आकर्षक होता.


सोनम कपूरची प्रत्येक झलक ही केवळ सौंदर्यदृष्ट्या देखणी नसते, तर तिच्या वैयक्तिक शैलीचा आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा परफेक्शन दर्शवणारी असते. विंबलडनमधील तिचा लूक हा स्टाईल आणि खेळ यांचा उत्तम संगम ठरला — जणू काही कोर्टवरील एखाद्या अचूक शॉट सारखा!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.