Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'सखे गं साजणी'च्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये दिसणारे कलाकार नक्की आहेत तरी कोण?

 *प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या रेडबल्बस्टुडिओ प्रस्तुत 'सखे गं साजणी'च्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये दिसणारे कलाकार नक्की आहेत तरी कोण?, लवकरच उलगडणार*


*प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसचा ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर*


*अभिषेक जावकर दिग्दर्शित 'सखे गं साजणी' चित्रपटाचं पोस्टर समोर, कलाकारांची नाव अद्याप गुलदस्त्यात, नक्की आहे तरी कोण?*

 

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे 'सखे गं साजनी' या नव्या चित्रपटाच्या पोस्टरची. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊस मार्फत हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने यापूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने त्यांच्या 'रेडबल्ब प्रॉडक्शन' हाऊसचा नवा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर शेअर करत चित्रपटाची अधिकची माहिती दिली आहे. समोर आलेल्या पोस्टरवरील पाठमोऱ्या उभ्या असलेल्या कलाकारांनी अर्थातच चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे. नेमका हा चित्रपट काय आहे, यांत कोण असणार आहे हे समोर आलेल्या पोस्टरवरून स्पष्ट होत नाही त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये एकूणच याची उत्सुकता रंगली आहे.



या समोर आलेल्या 'सखे गं साजणी' चित्रपटाच्या पोस्टरने खरंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. समुद्र किनारी हे तीन मित्र म्हणजेच दोन मुली आणि एक मुलगा पाठमोरे उभे असून त्यांनी हाताने हार्ट ईमोजी केलेला पाहायला मिळत आहे. चित्रपटातील हे तीनही कलाकार पाठमोरे असल्याने त्यांचे चेहरे दिसत नसल्याने चित्रपटात नेमकं कोण दिसणार आहे याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. अर्थात या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अस्पष्ट आहे. शिवाय कथा नेमकी काय असणार हे देखील गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित हा 'सखे गं साजणी' चित्रपट असणार आहे.


'रेडब्लब स्टुडिओ' प्रस्तुत, दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘सखे गं साजणी’ हा नवाकोरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत यांनी सांभाळली आहे. प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर या सिनेविश्वातील लोकप्रिय जोडीच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे हा नवाकोरा सिनेमा रसिकांच्या भेटीस येत आहे. तर सहनिर्माते म्हणून अभिजीत खांडकेकर आणि अभिषेक दिलीप वाकचौरे यांनी बाजू सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतकार विजय भटे यांनी पेलवली आहे. आता समोर आलेल्या या पोस्टरवरून चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?, चित्रपटाची कथा नेमकी काय असणार याची उत्सुकता आहे आणि लवकरच या उत्सुकतेला पूर्णविरामही मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.