Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अधोक्षजचा घर सोडण्याचा निर्णय इंदू बदलू शकेल? *

 *अधोक्षजचा घर सोडण्याचा निर्णय इंदू बदलू शकेल? *

पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



*मुंबई २२ जुलै, २०२५ :* कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आले आहे. दिग्रसकर कुटुंबात आनंदी आणि विंजे यांचा पुंडलिकला  लाच देण्याचा प्रयत्न फसल्याने वातावरण चिघळल्याने दोषारोपांचा भडिमार होताना दिसणार आहे. आनंदी थेट इंदूवर आणि व्यंकूवर आरोप करते, पण नेमके  असे कोणते आरोप केले तिने कि अधू भावनिक गोंधळात इंद्रायणीसोबत घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतो, पण नियती वेगळंच काही ठरवत असते. त्या रात्री इंदूला असा काही दृष्टांत होतो ज्यानंतर इंदूच्या डोक्यात फक्त  एकच विचार येतो कि घर आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी तिच्यावरच आहे, आणि ती अधुला थांबवते आणि त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. या निर्णयाने त्यांच्या नात्यात अंतर निर्माण होणार का ? इंदू समोर उभं असलेलं आव्हानं  आणि पुंडलिकला ती कसे चोख उत्तर देणार ? सुनेचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ती कशी पार पडणार ? मालिकेत पुढे काय घडणार ? जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



इंदू जेव्हा पुंडलिकचं आव्हान स्वीकारते, तेव्हा त्यानंतरचा आदू-इंदूचा सुंदर क्षण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो. आदू इंदूला बाहेर घेऊन जातो, तिच्यासोबत वेळ घालवतो जिथे दोघं शांततेत, प्रेमात आणि परस्पर आधारात गुंतून जातात. हे नातं फक्त संघर्ष नाही, तर आपुलकीचंही प्रतिक आहे. 

या आठवड्यापासून आता खरी कसोटी सुरू होणार आहे. दिग्रसकरांच्या गादीवर डोळा ठेवणारा, आणि इंदूच्या नवऱ्याचा म्हणजेच आदूचा वारंवार अपमान करणारा पुंडलिक, त्याला इंदू आता चोख उत्तर देण्यास सज्ज होणार.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.