शहराच्या प्रेमात पडलो मी - अभिजीत सावंत !
पॅरिसच्या प्रेमात पडलेला अभिजीत सावंत !
कलाकार कायम त्यांचा व्यस्त कामातून वेळ काढून कुठेतरी छान निवांत ठिकाणी एखादी ट्रीप करताना दिसतात आणि असा एक गायक कलाकार अभिजीत सावंत देखील सध्या कुटुंबा सोबत पॅरिस ट्रीप वर फिरताना दिसतोय.
पॅरिस फिरून तिथली संस्कृती, तिकडेच खास पदार्थ आयफिल टॉवर ची सफर अभिजीत अनुभवताना दिसतोय. अभिजीत कायम कामासाठी ट्रॅव्हल करतो पण आता थोडा फॅमिली टाईम म्हणून अभिजीत सध्या पॅरिस आणि स्विझरलँड फिरतोय. एवढं नाही अभिजीत तिकडे देखील नवनवीन रील करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतोय.
सोशल मीडिया वर पॅरिस ट्रीपचे फोटो शेअर करून अभिजीत म्हणतो " आयफिल इन लव्ह विथ थीस ब्यूटीफुल सिटी ! एखादया शहराच्या प्रेमात पडून तिथलं सौंदर्य अनुभवण्याची मज्जा वेगळी आहे. कामातून वेळ काढून कुटुंबासोबत फिरून छान वेळ स्पेंड करतोय. मला कायम नवनवीन जागा फिरायला आवडतात आणि अश्यातच पॅरिस सारखी नवीन जागा फिरताना अनेक नवनवीन अनुभव येतात आणि त्यातही एक वेगळी गंमत आहे"
सध्या अभिजीत त्याचा नवनवीन ट्रेंडिंग गाण्यामुळे चर्चेत देखील आहे.आता येणाऱ्या काळात अभिजीत अजून काय काम करणार कोणते नवीन प्रोजेक्ट्स करणार याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे !
https://www.instagram.com/p/DLP0Ko_ThXC/?igsh=MTJ4MjE1eHh4bHZvag==