'सैयारा' या बहुप्रतीक्षित प्रेमकथेचा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता यशराज फिल्म्सकडून प्रदर्शित होणार!
प्रेक्षकांच्या उत्कंठा ताणणारी 'सैयारा' ही प्रेमकथा यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांना पहिल्यांदाच एकत्र आणते. दोघांनीही अजरामर प्रेमकथांची निर्मिती केली आहे, आणि यावेळी त्यांच्या सहकार्यामुळे एक नवीन रोमँटिक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.
'सैयारा' सध्या नव्या पिढीसाठी सर्वात चर्चेत असलेली प्रेमकथा आहे. चित्रपटाचे संगीत आधीच वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम ठरत आहे. यात फहीम-अर्सलान यांचे टायटल ट्रॅक सैयारा, जुबिन नौटियाल यांचे बर्बाद , विशाल मिश्रा यांचे तुम हो तो, सचेत-परंपरा यांचे हमसफर आणि अरिजीत सिंग आणि मिथून यांचे धुन हे गाणे देशभरातील म्युझिक चार्ट्स वर धुमाकूळ घालतात आहेत.
यशराज फिल्म्स उद्या सकाळी ११ वाजता 'सैयारा' चा ट्रेलर रिलीज करणार आहे. याला भारतीय तरुणांसाठी एक "अपॉइंटमेंट व्ह्यूइंग" इव्हेंट म्हणून सादर केलं जात आहे.
या चित्रपटाला आत्तापर्यंत भावनिक आणि खोल प्रेमकथेच्या मांडणीसाठी एकमताने प्रशंसा मिळाली आहे. दोन्ही नवोदित कलाकारांमधील सहज केमिस्ट्री आणि उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्रपटातून अहान पांडे यशराज फिल्म्सच्या नायक म्हणून पदार्पण करत आहेत. तसेच बिग गर्ल्स डोंट क्राय या समीक्षात्मक दृष्टिकोनातून गाजलेल्या मालिकेतून लोकप्रिय झालेली अनीत पड्डा ही वायआरएफ ची पुढील नायिका म्हणून निवडली गेली आहे.
'सैयारा' या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी केली असून, हा चित्रपट १८ जुलै, २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
https://www.instagram.com/p/DLy34jwhrrN/?utm_source=ig_web_copy_link