"सैयारा नवोदित कलाकारांसोबत बनवण्याचा विचार मी सोडून दिला होता, कारण अभिनयक्षम चेहऱ्याच मिळत नव्हते!" – मोहित सूरी
हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घ काळानंतर 'सैयारा' ही नवोदित कलाकारांसोबत ची सर्वाधिक चर्चेत असलेली प्रेमकथा ठरली आहे. आज यशराज फिल्म्स ने सैयाराचा ट्रेलर प्रदर्शित केला आणि लगेचच इंटरनेटवर त्याचा जलवा पसरला आहे .
दिग्दर्शक मोहित सूरी यांनी खुलासा केला की, एक वेळ अशी होती की त्यांनी सैयारा नवोदित कलाकारांसह बनवण्याचा विचार सोडून दिला होता, कारण त्यांना अभिनयक्षम नवोदित कलाकार मिळत नव्हते. मात्र अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या भेटीने त्यांचा विश्वास पुन्हा जागवला.
मोहित म्हणतात,“जर मला अहान पांडे आणि अनीत पड्डा हे दोघे ताकदवान कलाकार भेटले नसते, तर मी ‘सैयारा’ बनवलाच नसता.” मी खरंतर दुसरा प्रोजेक्ट करायचा विचार करत होतो, तेव्हाच यशराज फिल्म्सच्या माध्यमातून माझी ओळख झाली, जे नव्या प्रेमकथेसाठी अहान व अनीतला तयार करत होते.
👉 सैयाराचा ट्रेलर इथे पहा: https://youtu.be/9r-tT5IN0vg?si=DMcFvG6B7XNl9aU7
ते पुढे म्हणतात,“जेव्हा आपण नवोदित कलाकारांसह प्रेमकथा करतो, तेव्हा त्यांच्याकडे ती भावनिक खोली असणे गरजेचे असते, जी प्रेक्षकांना विश्वास देईल. रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट यांच्यासारखे परिपक्व अभिनय कोणीही अपेक्षित करत नाही, पण त्यांनी स्क्रीनवर स्वतःचा ठसा उठवायला हवा. सुरुवातीला मला असे कलाकारच मिळाले नाहीत.”
मोहित पुढे म्हणतो ,“मी ही स्क्रिप्ट स्टार चेहऱ्यांसोबत कॉमर्शियल पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. पण लेखनप्रक्रियेचा वेळ लागला आणि यशराज फिल्म्सकडून मला आहान व अनीतचे ऑडिशन बघायला मिळाले. मी त्यांच्या अभिनय आणि भावनिक खोलीवर विश्वास ठेवून वेळ घालवला. आणि मी चकित झालो – हे दोघं नवोदित असूनही त्यांच्या अभिनयात समर्पण आणि दृष्टिकोन आहे.”
मोहित म्हणतो ,"अशा नव्या चेहऱ्यांबरोबर प्रेमकथा बनवणं ही फारच ताजीतवानी गोष्ट आहे. मला आनंद आहे की हे दोघं भेटले, आणि त्यामुळे मी ही कथा तशीच साकारत आहे, जशी ती लिहिण्यात आली होती.”
'सैयारा' साठी यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी पहिल्यांदाच एकत्र ाले आहेत – दोघेही अजरामर प्रेमकथांच्या निर्मितीसाठी ओळखले जातात.
या चित्रपटाने आधीच वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम दिला आहे – फहीम-अर्सलान यांचं टायटल ट्रॅक सैयारा, जुबिन नौटियाल यांचं बर्बाद , विशाल मिश्रा यांचं तुम हो तो, सचेत-परंपरा यांचं हमसफर, आणि अरिजीत सिंग व मिथून यांचं धुन यासारखी गाणी संगीत चार्टवर धुमाकूळ घालत आहेत.
वायआरएफ चे सीइओ अक्षय विधानी, जे या चित्रपटाचे निर्माता आहेत, म्हणतात,
“वायआरएफ मध्ये आम्ही अशा प्रेमकथांचा वारसा जपतो, ज्या प्रेक्षकांच्या हृदयात दीर्घकाळ घर करून राहतात.” मोहित सूरींसोबत हे सहकार्य खूपच नैसर्गिक होतं, कारण त्यांनाही ही शैली तितकीच प्रिय आहे.
ते पुढे म्हणतात,“ही एक प्रेमकथा आहे जिच्यात वायआरएफ ची सिग्नेचर शैली आहे, पण त्यात मोहित सूरींचा इंटेंस रोमांस देखील आहे, जो प्रेक्षक गेल्या २० वर्षांपासून प्रेमकथा साकारत आले आहेत. नवोदित कलाकारांसोबत अशी कथा बऱ्याच काळानंतर येते आहे, आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना ही कहाणी ताजी वाटेल.”
'सैयारा' १८ जुलै २०२५ रोजी संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.