यंदा फ्रेण्डशीप डे निमित्त रश्मिका मंदाना आणि स्नॅपचॅटकडून भारतातील स्नॅपचॅटर्सना खास 'स्ट्रीक रिस्टोर' भेट!
जगभरात पहिल्यांदाच फ्रेण्डशीप डे साजरा करण्यासाठी स्नॅपचॅट भारतातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासोबत सहयोग करत आहे, ज्यासह भारतीय स्नॅपचॅटर्सना 'स्ट्रीक रिस्टोर' संधी मिळेल. स्नॅप स्ट्रीक्स हे स्नॅपचॅटवरील प्रसिद्ध उत्पादन वैशिष्ट्य आहे, जे मित्रांमधील चालू असलेल्या वास्तविक संबंधांना साजरे करते आणि मित्र एकमेकांना किती वेळा स्नॅप पाठवतात हे निदर्शनास आणते. ३० जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत भारतातील स्नॅपचॅटर्सना मोफत पाच विशेष स्ट्रीक रिस्टोर करण्याची मर्यादित कालावधीची संधी मिळेल. स्ट्रीक रिस्टोर हा नेहमीच्या स्नॅपचॅट अनुभवाचा भाग नाही, तर जवळचे मित्र व कुटुंबाशी पुन्हा कनेक्ट होण्याची अनोखी संधी देतो. हे वैशिष्ट्य लाँच करण्यासाठी भारतातील लोकप्रिय व राष्ट्रीय आयकॉन आणि खऱ्या, अर्थपूर्ण नात्यांना साजरे करणाऱ्या रश्मिका मंदाना यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोण असू शकते?
स्नॅपचॅट 'बेस्टीज बिटमोजी लेन्स' देखील लाँच करत आहे, हा एक नवीन मजेदार एआर अनुभव आहे, जो तुम्हाला तुमच्या जिवलग मित्रांना व्हर्च्युअल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्याची संधी देतो, कारण थोडेसे प्रेम व्यक्त केल्याशिवाय फ्रेण्डशीप डे अपूर्ण आहे.
मुंबईत फक्त निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेला उत्साहपूर्ण कार्यक्रम 'स्नॅप विथ स्टार्स'मध्ये रश्मिका मंदाना यांनी स्नॅपचॅटच्या टॉप फॅशन व ब्युटी क्रिएटर्ससोबत सहयोग केला, जेथे रश्मिका मंदाना यांचा नवीन परफ्यूम ब्रँड 'डिअर डायरी' देखील लाँच करण्यात आला. हे क्रिएटर्स अधिकृत ####DearDiarySnapStarSquad चा भाग असतील आणि ब्रँडसाठी नियमितपणे कन्टेन्ट तयार करतील. त्यांनी अभिनेत्रीसोबत गप्पागोष्टी केल्या, आठवणी शेअर केल्या आणि काही मनमोकळ्या कबुली दिल्या. या कार्यक्रमामध्ये परफ्यूममागील प्रेरणास्रोत पाहायला मिळाले, जेथे महत्त्वपूर्ण आठवणींचे जतन करण्याच्या समान थीमवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
रश्मिका मंदाना म्हणाल्या, ''माझे मित्रमैत्रिणी माझ्यासाठी सर्वस्व आहेत, ते माझ्या वास्तविक जीवनातील डायरी आहेत. माझा नवीन परफ्यूम ब्रँड 'डिअर डायरी'सह माझी गोड आठवणींच्या उत्साहपूर्ण भावनेला व्यापून घेण्याची इच्छा होती. फ्रेण्डशीप डे साठी स्नॅपचॅटसोबत हा सहयोग परिपूर्ण आहे. स्नॅपचॅट असे व्यासपीठ आहे, जेथे आपण सर्व आपल्या दैनंदिन गाथा शेअर करतो आणि व्हिज्युअली अशा गोड आठवणी तयार करतो. आपल्याला स्ट्रीक रिस्टोर करण्याची संधी मिळाली असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या विचारशील सुविधेमधून निदर्शनास येते की जीवनात चढ-उतार येऊ शकतात, पण वास्तविक नात्यांना दुसरी संधी मिळाली पाहिजे. स्नॅपचॅट आणि 'डिअर डायरी' दोन्ही अशा क्षणांसाठीचे प्रेमपत्र आहेत, जे आपण कधीच विसरू इच्छित नाही.''
स्नॅप इन्क इंडियाच्या कन्टेन्ट अँड एआर पार्टनरशीप्सचे संचालक साकेत झा सौरभ म्हणाले, ''मैत्री हे स्नॅपचॅटचे मुलभूत तत्त्व आहे. या व्यासपीठामुळे लोक त्यांचे जिवलग मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांशी संपर्कात राहतात. त्यामुळे खरी आणि मनापासूनची नाती जपणाऱ्या रश्मिका मंदाना यांच्याशी सहयोग करणे अगदी स्वाभाविक होते. यंदा फ्रेण्डशीप डे निमित्ताने आमचे लोकप्रिय स्नॅप स्टार क्रिएटर्स व रश्मिका एकत्र आले आणि रश्मिका यांचा ब्रँड 'डिअर डायरी'च्या लाँचचे खास सेलिब्रेशन केले. यासोबत आम्ही समुदायाला आमच्या व्यासपीठावरील लोकप्रिय वैशिष्ट्य स्ट्रीक्स आणि विशेष बेस्टी एआर लेन्स रिस्टोर करण्याची विशेष संधी दिली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण नात्यांना अधिक दृढ करता आले.''
जुन्या स्ट्रीकला पुन्हा सुरू करायचे असो किंवा नात्यांना जपायचे असो यंदा फ्रेण्डशीप डे निमित्त स्नॅपचॅट जनरेशन झेडला महत्त्वपूर्ण गोष्टी पुन्हा आणण्याची संधी देत आहे, त्या म्हणजे नाती, सर्जनशीलता आणि जुन्या आठवणी.