Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभिजीत सावंतच्या नव्या लूक मागचं कारण आलं समोर !

 अभिजीत सावंतच्या नव्या लूक मागचं कारण आलं समोर !

चाल तुरु तुरु नंतर अभिजीत करणार हे नवं गाणं !


सदाबहार आवाजाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला गायक अभिजीत सावंत ! अभिजीत सावंतला संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण झाली असून अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. अश्यातच अभिजीत ने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर नव्या लूकचे फोटो शेयर केले होते आणि आता या लूक मागचं खरं कारण समोर आलं आहे. 



अभिजीत " पैसा थेंब थेंब गळं " हे नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय. अभिजीत च्या आवाजाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे आणि तो येणाऱ्या काळात देखील वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स करणार आहे.


मागच्या काही दिवसात झालेल्या मुलाखती मधून अभिजीत गाण्याच्या सोबतीने अभिनय देखील करणार का? अश्या चर्चांना उधाण आलं होत पण अभिजीत गायक म्हणून तर सगळ्यांना माहीत आहे पण तो अभिनय देखील करणार का हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.