Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"ठाई ठाई विठ्ठल" हे विठ्ठलाचे नवीन गीत मंत्रमुग्ध करून टाकणारे

 केतकी माटेगांवकर, अवधूत गांधी ह्यांनी गायलेले ,सुहित अभ्यंकर ह्यांनी संगीतबद्ध केलेले आणि अक्षयराजे शिंदे ह्यांनी लिहिलेले "ठाई ठाई विठ्ठल" हे विठ्ठलाचे नवीन गीत मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे. 


विठ्ठल माउलींच्या  ह्या गाण्यातून एक नवा विचार मांडण्याच्या प्रयत्न ह्या सर्वांनी केला आहे.



माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात आणि जातात. आयुष्याच्या प्रवासात विठूमाऊली अनेक रूपात आपल्यालाला दर्शन देतात. शेतकऱ्याला पावसाच्या रूपात, रुग्णाला डॉक्टरच्या रूपात, लेकरला आईच्या रूपात, मावळ्याला प्रिय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आणि आपल्या सगळ्यांच्याही माऊली  अवती भवतीच आहे, ठीक ठिकाणी आहे. 


गीतकार अक्षयराजे शिंदे आणि संगीतकार सुहित अभ्यंकर म्हणतात आम्हाला सर्वांना आमचा विठ्ठल गाण्याच्या स्वरूपात भेटला आहे. 


तुम्हाल ही ह्या विचाराची अनुभूती नक्की ह्या गाण्यातून होईल 

नक्की ऐका  ठाई ठाई विठ्ठल टाइम्स म्युसिक स्पिरिचूअल ह्या YouTube चॅनेलवर - https://youtu.be/Q4A1pCYTNx0?si=csQoX7mzj2RMKlNf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.