जागतिक पर्यावरण दिनी प्लास्टिक कचरा आणि पर्यावरणीय जबाबदारीबद्दल जनजागृती करत आहेत झी टीव्ही वरील कलाकार!
जागतिक पर्यावरण दिन 2025 हा 'प्लास्टिक प्रदूषण संपवणे' या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेसह साजरा करण्यासाठी अख्खे जग एकत्र येत असताना झी टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार केवळ त्याबद्दल चिंता व्यक्त करत नाहीयेत, तर त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांनी केलेल्या सजग बदलही शेअर करत आहेत. झी टीव्हीवरील ‘जमाई नं. 1’ मधील सिमरन कौर, ‘भाग्य लक्ष्मी’ मधील ऐश्वर्या खरे, ‘कुमकुम भाग्य’ मधील शक्ती आनंद, ‘सरु’ मधील मोहक मटकर, ‘वसुधा’ मधील सचिन पारिख आणि ‘जागृति – एक नयी सुबह’ मधील आर्य बब्बर — हे कलाकार प्लास्टिक कचऱ्यावर आणि पर्यावरणीय जबाबदारीवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणत आहेत. त्यांच्या ऑन-स्क्रीन अभिनयाबरोबरच त्यांच्या ऑफ-स्क्रीन प्रभावामुळे, या कलाकारांच्या मते बदलाची खरी सुरुवात ही वैयक्तिक जबाबदारीने होते. पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली वापरणे असो किंवा सेटवर अधिक शाश्वत पर्याय निवडण्यासाठी इतरांना प्रेरित करणे असो, त्यांच्या कृती आपल्याला आठवण करून देतात की खरा प्रभाव छोटी, पण सातत्यपूर्ण पावले उचलण्यातून येतो.
‘जमाई नं. 1’ मध्ये रिद्धीची भूमिका साकारत असलेली सिमरन कौर म्हणाली,
"जागतिक पर्यावरण दिन मला नेहमीच क्षणभर थांबून विचार करण्यास प्रवृत्त करतो. पण यंदा 'प्लास्टिक प्रदूषण संपवणे' ही संकल्पना मला खूपच वैयक्तिक स्तरावरील वाटत आहे. लहानपणी समुद्रकिनाऱ्यावर चालत असताना शंख-शिंपले गोळा करताना, पायांवर फेसाळणाऱ्या लाटा जाणवत घेणे, त्या आठवणी आजही जिवंत आहेत. पण आज त्याच किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग दिसतात. ही स्थिती फारच दुःखद आहे. मी माझ्या जीवनशैलीत छोट्या पण सजग सवयी अंगीकारल्या — स्वतःची पाण्याची बाटली बाळगणे, प्लास्टिक स्ट्रॉ आणि पिशव्यांचा वापर न करणे तसेच शाश्वत पॅकेजिंग निवडणे. सेटवरही मी प्लास्टिक-मुक्त पर्याय मागते. अशा छोट्या कृतीच एकत्र येऊन मोठा बदल घडवू शकतात. प्लास्टिक प्रदूषण केवळ डोळ्यांना खटकणारे दृश्य नाही — ते आपल्या सागरी जीवसृष्टीसाठी, परिसंस्थेसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी एक धोका आहे. आपल्याला याकडे गंभीरपणे पाहावे लागेल. आता वेळ आली आहे ती प्लास्टिकला कायमचा रामराम करण्याची. आपली पृथ्वी आपल्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करते — आणि मला खरंच वाटते की आपण ती अपेक्षा पूर्ण करू शकतो."
‘भाग्य लक्ष्मी’ मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या खरे म्हणाली,
"प्लास्टिक सर्वत्र आहे – आपल्या घरात, समुद्रात आणि अगदी आपण श्वास घेतो त्या हवेतसुद्धा. काही वर्षांपूर्वी एका समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत भाग घेतला आणि तिथे एक कासव प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये अडकलेले पाहिले — ते माझ्या डोळ्यांसमोर अजूनही आहे. तेव्हापासून मी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा निश्चय केला. मी कायम माझा री-यूजेबल किट – मेटल कटलरी, स्टील स्ट्रॉ आणि फोल्ड होणारा कप – बाळगते. हे आता माझ्या जीवनशैलीचा भाग झालंय. मी पॅकबंद स्नॅक्स टाळते आणि प्रवासासाठी भरपूर पाणी सोबत घेते. सतत प्रवासात असताना अशा लहान सवयींचा मोठा परिणाम होतो. मी सेटवर अनेक लोकांना हेच करताना पाहिलंय, त्यामुळे आशा वाटते. प्लास्टिक प्रदूषण थांबवणे म्हणजे केवळ पर्यावरणपुरक चळवळ नाही — ती वैयक्तिक जबाबदारी आहे. ही दररोज सजग निवड करण्याबद्दल आहे. या पर्यावरण दिनी, चला आपण सर्वांनी प्लास्टिक कमी करण्याचा संकल्प करू — स्वतःसाठी, एकमेकांसाठी, आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी."
‘कुमकुम भाग्य’ मध्ये करणची भूमिका साकारणारा शक्ती आनंद म्हणाला,
"एक अभिनेता म्हणून माझा वेळ सतत प्रवासात जातो — शूटिंग, इव्हेंट्स, प्रवास — आणि तेव्हा लक्षात येते की सिंगल-यूज प्लास्टिक किती सहज आपल्या जीवनात शिरले आहे. जेव्हा आपण सजग होतो, तेव्हाच त्याचे अस्तित्व जाणवते. या जागतिक पर्यावरण दिनी मी माझा प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प केला आहे. आता मी माझी पाण्याची बाटली, स्वतःची कटलरी आणि मेटल स्ट्रॉ बाळगतो, आणि कापडी पिशवीसुद्धा नेहमी सोबत ठेवतो. सेटवर मी इतरांना शाश्वत पर्याय निवडण्यासाठी प्रोत्साहित करतो. बदल फार मोठा नसला तरी तो सातत्यपूर्ण हवा. आपण सर्वांनी काही सजग पावले उचलली, तर त्याचा परिणाम मोठा होईल. प्लास्टिक प्रदूषण संपवण्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका आहे."
‘जागृति – एक नयी सुबह’ मध्ये कलिकांत ठाकूरची भूमिका साकारणारा आर्य बब्बर म्हणाला,
"मागच्या वर्षी एका ट्रेक दरम्यान जेव्हा मी एका डोंगरशिखरावर पोहोचलो, तेव्हा तिथे असावी तशी निर्मळ हवा आणि नैसर्गिक सौंदर्य नसून, प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांनी भरलेली जमीन पाहून धक्का बसला. त्या गोष्टीने माझ्यावर खोल प्रभाव टाकला. तेव्हापासून मी सिंगल-यूज प्लास्टिकला पूर्णपणे निरोप दिला. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, स्ट्रॉ — काहीही वापरत नाही. घरी मी कंपोस्ट होणारे कचरा पिशव्या वापरतो, आणि प्रवासात प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी सॉलिड शॅम्पू बार वापरतो. आयुष्य एकदम बदलणं कठीण आहे, पण विचारपूर्वक निवडी करणे शक्य आहे. मी माझ्या मित्रमंडळींना आणि कुटुंबीयांनाही अशा बदलांसाठी प्रेरित करतो. हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही — हे सजग असण्याबद्दल आहे. आणि काही तरी मोठ्या उद्दिष्टाचा भाग असण्याबद्दल आहे. प्रत्येक छोटं पाऊल मोलाचं असतं. कारण आपण जर इतरांकडून बदलाची वाट पाहत राहिलो, तर फार उशीर होईल. आता कृती करण्याची वेळ आहे."
‘सरु’ मध्ये सरुची भूमिका साकारणारी मोहक मटकर म्हणाली,
"लहानपणी मी आजोळी घालवलेली उन्हाळ्याची सुट्टी ही शांतपणे खूप काही शिकवून गेली. आजीआजोबांनी कधी शाश्वत जीवनशैली शिकवली नाही – ते ती तशीच जगत होते. अन्न काचेच्या बरण्यांमध्ये, पाणी तांब्यात, उरलेले जेवण स्टीलच्या डब्यांमध्ये, आणि मसाले सुती पिशव्यांमध्ये ठेवले जात. 'वापर आणि फेक' असा काही प्रकारच नव्हता — 'वापरा, पुन्हा वापरा, आणि सन्मान करा' अशी शिकवण होती. आज मी तेच मूल्य माझ्या जीवनात उतरवतो. घरीही शाश्वत पर्याय निवडतो, आणि प्लास्टिक वापर कमी करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या कुटुंबाने एक सवय लावली आहे — दर वर्षी जागतिक पर्यावरण दिनी आम्ही वर्षभर साठवलेला प्लास्टिक कचरा एका सेवाभावी संस्थेला देतो जे त्याचे रिसायकलिंग करतात. हा एक छोटा प्रयत्न असला, तरी बदलाची सुरुवात नेहमीच मनापासून आणि रोजच्या निवडीतून होते. आपल्या आजीआजोबांनी आपल्यासाठी जपलेली ही पृथ्वी — आपणही ती पुढच्या पिढीसाठी स्वच्छ आणि सुंदर ठेवावी हीच इच्छा आहे."