Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रणविजय सिंघ झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाव’ या शो चे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला

 रणविजय सिंघ झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाव’ या शो चे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला असून तो म्हणतो, "शहरी जीवनातील सुखसोयी उपभोगतानाच मी मातीशीही जोडलेला असल्यामुळे या फॉरमॅटने माझ्यासोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधला."



भारताच्या विविधतेचा आणि भावनिक सखोलपणाचा उत्सव साजरा करणाऱ्या वेगळ्या नॉन-फिक्शन फॉरमॅटच्या परंपरेला पुढे नेत झी टीव्ही वाहिनी ‘छोरियाँ चली गाव’ या शो ची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. हा ताज्या दमाचा आणि खास रिअ‍ॅलिटी शो "इंडिया" आणि "भारत" या दोन जगांना एकत्र आणतो. ‘आपका अपना झी’ या नवीन ब्रँड ओळखीअंतर्गत हा शो प्रेक्षकांना परिवर्तन, सांस्कृतिक एकरूपता आणि मानवी नात्यांच्या हृदयस्पर्शी प्रवासावर घेऊन जाण्याचे वचन देतो.


या कार्यक्रमात 12 स्वयंसिद्ध शहरी महिला त्यांचे आरामदायक आणि जलदगती शहरी जीवन सोडून 60 पेक्षा अधिक दिवस भारतीय ग्रामीण भागात घालवतील. कुठल्याही गॅजेट्स, आरामदायक गोष्टी किंवा शॉर्टकट्स न वापरता, त्या खऱ्याखुऱ्या गावातली कामे करतील, दैनंदिन जीवनात सहभागी होतील आणि वर्षानुवर्षांच्या परंपरांची साधेपणा आणि शहाणपण अंगीकारतील. शोची कथा तीन मजबूत स्तंभांवर आधारित आहे: ग्रामीण अस्तित्व आणि जुळवून घेणे, सांस्कृतिक समरसता आणि भावनिक वाढ तसेच स्पर्धा आणि सामाजिक रणनीति. चूल पेटवण्यापासून ते गावकऱ्यांशी घट्ट नातं बांधण्यापर्यंत, प्रत्येक एपिसोडमध्ये विनोद, संघर्ष, समज आणि प्रेरणेचा शक्तिशाली मिलाफ पाहायला मिळेल.


या फॉरमॅटमध्ये खरी भावना आणि ऊब आणत आहे टीव्हीवरील तरुण आणि लोकप्रिय चेहरा रणविजय सिंघा, जो या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून सामील झाला आहे. मात्र तो फक्त सूत्रसंचालक नाही, तर मार्गदर्शक, प्रोत्साहक, कथाकथन करणारा आणि गावकऱ्यांचा आवाजही असेल. भारताच्या खऱ्या रूपाशी असलेल्या त्याच्या नात्यामुळे तो स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे योग्य नेतृत्व करू शकतो.


या शोबाबत रणविजय म्हणाला, “जेव्हा मी ‘छोरियाँ चली गाव’च्या संकल्पनेबद्दल ऐकलं, तेव्हा मला लगेचच ती जबरदस्त वाटली. कारण मी स्वतः अशा व्यक्तींपैकी आहे, ज्यांनी शहरी जीवनाच्या सुविधा अनुभवल्या आहेत पण गावाकडच्या मातीशीही माझं घट्ट नातं आहे. या फॉरमॅटने माझ्यासोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधला. हा इतर रिअ‍ॅलिटी शोसारखा नाही, तर हा एक प्रवास आहे जो मानसिकतेत बदल घडवतो. जेव्हा आजच्या जलद समाधानाच्या जगात सगळं काही एका क्लिकवर मिळतं, तिथं हा शो त्या सगळ्या गोष्टींना आव्हान देतो. स्पर्धक प्रत्यक्षात कष्ट करून जेवण मिळवण्याचा खरा अर्थ समजतील. या सगळ्या अनुभवातून एक खरा बदल, साधेपणा आणि काहीतरी वेगळं पाहण्याची संधी मिळते. म्हणूनच मी या अर्थपूर्ण, मूळाशी जोडलेल्या आणि मनोरंजनाने भरलेल्या प्रवासाचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे. मला वाटतं, प्रेक्षक फक्त हा शो पाहणार नाहीत, तर अनुभवतीलसुद्धा आणि कदाचित त्यातच ते स्वतःलाही नव्याने शोधतील.”



‘छोरियाँ चली गाव’ लवकरच प्रीमियरसाठी सज्ज आहे आणि प्रेक्षक पाहणार आहेत ग्रामीण जीवनाचं खरंखुरं दर्शन, खरी भावना आणि त्यामागचे खरे सामर्थ्य, जेव्हा 12 महिला रणविजयसोबत आपल्या सवयींच्या दुनियेबाहेर पाऊल टाकतील.


पहा ‘छोरियाँ चली गाव’ झी टीव्हीवर – जिथे जलद शहरी जीवन आणि शांत ग्रामीण जीवन एकमेकांसमोर उभे ठाकतील मग खऱ्या गोष्टी समोर येतील!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.