प्रेमाची कथा... जी पूर्ण करते, पण बरबादही करू शकते!" ‘सैयारा’च्या दुसऱ्या गाण्याची धमाकेदार तयारी .
हिट ठरलेल्या टायटल ट्रॅक सैयारा नंतर, यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी उद्या सकाळी सैयारा चित्रपटातील दुसरे गाणे ‘बर्बाद’ रिलीज करणार आहेत!
निर्मात्यांनी आणि लीड कलाकारांनी — अहान पांडे आणि अनीत पड्डा — गाण्याच्या लॉन्चपूर्वी एक खास पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. (लिंक)
https://www.instagram.com/p/DKqxnQ-o0EO/?igsh=NzE3ZG5za2F2cGMz
टीझर लॉन्चपासूनच सैयारा — ज्याचे दिग्दर्शन मोहित सूरी आणि निर्मिती वायआरएफने केली आहे — ही 2025 मधील सर्वात बहुप्रतिक्षित प्रेमकथा बनली आहे. वायआरएफ आणि मोहित सूरी दोघेही अजरामर प्रेमकथा सादर करण्यासाठी ओळखले जातात. पदार्पण करणाऱ्या कलाकारांची जबरदस्त केमिस्ट्री आणि अभिनय क्षमतांमुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत.
‘सैयारा’ या नावानेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. याचा अर्थ आहे — एक भटकत राहणारा आकाशातील तारा. पण कवितांमध्ये हा शब्द अनेकदा एखाद्या तेजस्वी, अलौकिक, स्पर्शात नसलेल्या पण सदैव मार्गदर्शक असलेल्या गोष्टीसाठी वापरला जातो — एक असा तारा जो झळकतो, मार्ग दाखवतो पण कधीही गवसत नाही.
हा चित्रपट अहान पांडे यांचा बॉलिवूड डेब्यू आहे, आणि त्यांच्या सोबत मुख्य भूमिकेत आहेत अनीत पड्डा, ज्या बिग गर्ल्स डोंट क्राई या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
सैयारा चे निर्माते आहेत वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी आणि हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जागतिक पातळीवर थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
पन्नास वर्षांच्या इतिहासात, वायआरएफने यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या माध्यमातून भारताला काही अजरामर प्रेमकथा दिल्या आहेत. त्याचवेळी, मोहित सूरी, जे सध्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या २०व्या वर्षात आहेत, त्यांनी आशिकी २, मलंग, एक व्हिलन यांसारख्या लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.