Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*महाराष्ट्राची संस्कृती आणि संगीताच्या जादूची झलक प्रशांत नाकतीच्या 'मराठी ठेका' गाण्यातून करतेय मंत्रमुग्ध*

 *महाराष्ट्राची संस्कृती आणि संगीताच्या जादूची झलक प्रशांत नाकतीच्या 'मराठी ठेका' गाण्यातून करतेय मंत्रमुग्ध*


*नव्या दमाच्या ऊर्जेसह मराठ्यांना थिरकायला भाग पाडतंय मराठमोळं 'मराठी ठेका' गाणं*

*परदेशी पाहुणीला पडलीय महाराष्ट्रातील मराठीची भुरळ, 'मराठी ठेका' गाण्यातून झलक समोर*


*प्रशांत नाकतीच्या 'मराठी ठेका' गाण्यात इरिना रुडाकोवाची वर्णी, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे होतंय कौतुक*



सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये नांदते मराठी,

कोकणातला गोडवा माझी ही मराठी...

विदर्भाची, दक्खनची शान ही मराठी,

दिल्लीचेही तख्त राखिते माय मराठी...


गाण्यातील या ओळींनी प्रत्येक मराठी माणसाला स्फूर्ती मिळत आहे. महाराष्ट्रातील आपली नाती-गोती, सणवार जपत आपल्या मराठी मायभूमीवर साऱ्या मराठी बांधवांना बांधून ठेवलं आहे. मराठी असल्याचा गर्व उराशी ठेवून आज प्रत्येक मराठी माणूस अगदी ताठ मानेने वावरत आहे. आपल्या मराठी भाषेचे करावे तितके कौतुक कमीच. मराठी माणसं, त्यांचा मराठमोळा देश, मराठमोळा पेहराव, मराठी सण, मराठी भाषा या सगळ्यांची झलक आता एकाच दमदार अशा मराठमोळ्या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार प्रशांत नाकती यांच्या संकल्पनेतून भेटीस आलेलं हे 'मराठी ठेका' गाणं साऱ्या मराठ्यांना ठेका धरायला लावतंय.


 मराठी संगीताची पारंपरिक ढवळी, हलगी आणि लयबद्ध ठेका या गाण्यात नव्या दमाच्या उर्जेसह अनुभवायला मिळतोय. या मराठमोळ्या गाण्यातून आपणा सर्वा मराठी माणसांना मराठी किती महत्त्वाची आहे, मराठी आपला प्राण आहे, याला विसरून चालायचं नाही याची आठवण करुन दिली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गाण्याचे चित्रीकरण थेट महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी या गावात करण्यात आले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी शूट केलेल्या दृश्यांनी गाण्याला एक भव्य आणि सुरेख पार्श्वभूमी दिली आहे.



फक्त मनोरंजन नव्हे, तर मराठी संस्कृतीचा ठसा जगभर उमटवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न मराठी ठेका या गाण्यातून करण्यात आला आहे. प्रशांत नाकती म्युझिकलच्या या मराठी गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित जाधव याने केले असून नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी कोरियोग्राफर अर्चित वारवाडे याने सांभाळली आहे. तर गाण्याचे छायाचित्रण सूरज राजपूत यांनी केले आहे. या गाण्यात निक शिंदे, विशाल फाले, आयुष संजीव, भरत मदान, अपूर्वा पाटील, तश्वी भोईर या कलाकारांनी मनं जिंकली आणि विशेष आकर्षण ठरलेली परदेशी अभिनेत्री इरिना रुडाकोवाने प्रत्येकाच्या मनात घर केलं. गायनाची बाजू देखील तितकीच भक्कम असून, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या दमदार आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. गाण्याला प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांचं संगीत लाभलं असून, यात पारंपरिक वाद्यांची आधुनिक मिश्रणातून एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते.


इरिनाची एन्ट्रीवर 'मराठी ठेका' या मराठमोळ्या गाण्याची जोड साऱ्या महाराष्ट्राची नव्याने ओळख करुन देतेय. परदेशातून आलेल्या पाहुणीला महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक आणि संगीताचा ठेका या गाण्याद्वारे दाखवण्यात आला आहे. अल्पावधीतच या गाण्याने हजारो व्ह्यूज, लाईक्सचा टप्पा पार केला आहे. प्रशांत नाकतीच्या याआधीच्या गाण्यांचीही सोशल मीडियावर हवा पाहायला मिळाली. 'नौलखा हार', 'नखरेवाली', 'माझी बाय गो', 'मी नादखुळा', 'बाप्पा नादखुळा' या गाण्यांनी आजवर मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. आणि यानंतर आता प्रत्येक मराठी माणसाच्या दिलाचा ठेका चुकवायला 'मराठी ठेका' हे गाणं सज्ज झालं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.