Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*वामन हरी पेठे ज्वेलर्स कान्समध्ये! भारतीय दागिन्यांचे सौंदर्य जागतिक रंगमंचावर!*

 *वामन हरी पेठे ज्वेलर्स कान्समध्ये! भारतीय दागिन्यांचे सौंदर्य जागतिक रंगमंचावर!*


मुंबई : भारतातील सर्वात विश्वसनीय आणि परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५ च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या खास ब्रायडल कलेक्शनमधील पोल्की आणि पन्ना हार परिधान करून रेड कार्पेटवर प्रवेश केला आणि भारतीय पारंपरिक कारागिरी व कालातीत सौंदर्यशास्त्राने उपस्थितांचे मन जिंकले.



नेहाच्या सौंदर्याला साजेसा असा वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचा हा हार कुशल कारागिरांनी तयार केला असून तो शाही वारशाची प्रेरणा आणि निसर्गदत्त पन्न्यांच्या ताजेपणाचा संगम दर्शवतो. पारंपरिक पोल्कीच्या मोठ्या सेटिंग्ज आणि हिरव्या पन्नाचे देखणे रंग तिच्या आधुनिक पोशाखाला एक अनोखा क्लासिक टच देत होते. हा हार तिच्या लूकला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि भारतीय कलाकुसरीला रेड कार्पेटवर ग्लोबल स्पॉटलाइटमध्ये आणून ठेवले.


११५ वर्षांहून अधिक काळ स्त्रियांच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला दागिन्यांच्या माध्यमातून साजरे करणाऱ्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी या ऐतिहासिक क्षणाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय दागिन्यांच्या सौंदर्याची आणि परंपरेची साक्ष दिली.


नेहा पेंडसे हिने परिधान केलेले हे खास पोल्की आणि पन्ना दागिन्यांचे सेट आता भारतातील निवडक वामन हरी पेठे ज्वेलर्स शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.