Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘सन मराठी’च्या अभिनेत्रींचा खास अनुभव*

 *आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘सन मराठी’च्या अभिनेत्रींचा खास अनुभव*


 'सन मराठी'वरील प्रत्येक मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाही, तर प्रेक्षकांना प्रत्येक मालिकेतून महिला सशक्तीकरणाचा संदेशही मिळत असतो. वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये  जशी मुख्य अभिनेत्री आत्मविश्वासू आणि ठाम दिसते, तशीच ती खऱ्या आयुष्यातही सशक्त स्त्री आहे. 'तुझी माझी जमली जोडी' मालिकेतील सई म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुख फिटनेसप्रेमी आहे आणि योगा हा तिच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अस्मिताने तिचा वैयक्तिक योग अनुभव शेअर केला आहे. 



अस्मिता म्हणाली की, "इयत्ता तिसरीपासून मी योगा करण्यास सुरुवात केली. कलाकार म्हणून मला याचा खूप फायदा झाला आहे. रोजच्या शूटिंगसाठी भरपूर ऊर्जा लागते आणि योगामुळे ती ऊर्जा टिकून राहते. दिवसभर काम करूनसुद्धा मी थकत नाही. योगामुळे अनेक आजार दूर राहतात, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश नक्कीच करायला हवा. एक अभिनेत्री म्हणून माझ्या दिसण्यानं आणि व्यक्तिमत्त्वानं प्रेक्षकांवर सकारात्मक प्रभाव पडायला हवा. माझं काम पाहून किंवा माझ्याकडे पाहून प्रेक्षकांना उत्साह आणि ताजेपणाचा अनुभव यायला हवा. योगा माझ्यासाठी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक संतुलनासाठीही खूप महत्त्वाचा आहे."


याचसह 'आदिशक्ती' मालिकेतील शक्ती म्हणजे  अभिनेत्री राजसी चिटणीसने योग दिनाच्या शुभेच्छा देत तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. राजसी म्हणाली की,  "गेल्या काही महिन्यांपासून योगा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसाला १२-१३ तास चालणारं मालिकेचं चित्रीकरण, त्यात स्वतःसाठी वेळ काढणं हे खरंच एक मोठं आव्हान असतं. पण कितीही धावपळ असली, तरी मी दररोज एक तास योगासाठी काढते. योगामुळे केवळ शरीर नाही, तर मनही शांत राहतं. माझ्या त्वचेमध्ये नैसर्गिक उजळपणा आला आहे, पचनक्रिया सुधारली आहे. अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं आहे. योगाने मला ही ऊर्जा दिली आहे, म्हणूनच मी योगा  कायम सुरू ठेवणार आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.