सागर पारेखने ‘जागृति – एक नयी सुबह’च्या सेटवर आपल्या सहकलाकार आर्य बब्बर आणि विजयेंद्र कुमेरिया यांना घरी बनवलेले लिट्टी-चोखा खाऊ घालून एक खास ट्रीट दिली!
प्रत्येक मालिका त्यामधील पात्रांमधील केमिस्ट्रीवर फुलते – मग ती भावनिक नाती असोत किंवा संघर्षमय. झी टीव्हीवरील ‘जागृति – एक नयी सुबह’ या मालिकेत सागर पारेख हा आर्य बब्बर (कलिकांत ठाकूर) आणि विजयेंद्र कुमेरिया (सूरज) यांच्यासोबत काम करत आहे आणि जसे हे तिघे ऑन-स्क्रीन एक आकर्षक कौटुंबिक नाते उभे करत आहेत, तसेच त्यांची ऑफ-स्क्रीन मैत्रीही तितकीच सुंदर आहे. अलीकडेच सागरने सेटवर आपल्या सहकलाकारांसाठी आणि क्रू सदस्यांसाठी एक सुंदर गोष्ट केली – त्याने घरी बनवलेला लिट्टी-चोखा सर्वांसाठी आणला. हा त्याच्या मूळ गावचा एक पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याने सर्वांनाच त्यांच्या घरची आठवण करून दिली.
प्रत्येकाने या पारंपरिक चवीचा आनंद घेतला आणि घरगुती स्वादाची प्रशंसा केल्याशिवाय राहूच शकले नाहीत. कलाकार आणि क्रूने जेवताना खूप मजा केली आणि भरभरून कौतुक केले, ज्यामुळे तो शूटिंगचा दिवस एक खास आठवणीत बदलला. सागरच्या या सुंदर कृतीमुळे केवळ पोटच भरलं नाही, तर त्यांच्यातील नातेही अधिक दृढ झाले.
सागर पारेख म्हणाला, “मी सेटवर अनेक वेळा लिट्टी-चोख्याबद्दल बोलायचो आणि आर्य सर व विजयेंद्र दोघेही खूप उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यांनी खूप वेळापासून सांगितले होते की हा पदार्थ त्यांच्या 'मस्ट ट्राय' लिस्टमध्ये आहे. म्हणून मी विचार केला की माझ्या गावचा खास लिट्टी-चोखा घरी मम्मीकडून बनवून सर्वांना द्यावा. सर्वांची प्रतिक्रिया अप्रतिम होती. त्यांना तो खूप आवडला आणि ते कौतुक करतच राहिले!”
तो पुढे म्हणाला, “त्यांचा उत्साह आणि कौतुक ऐकून मला खूप अभिमान आणि समाधान वाटले. माझ्या सहकलाकारांसोबत माझी संस्कृती शेअर करावी आणि सर्वांना याचा स्वाद घेताना पाहणे हा शूटिंगचा दिवस खूप खास बनवून गेला.”
सेटवर लिट्टी-चोख्याच्या सुंदर चवीमुळे कलाकारांमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले आणि दुसरीकडे ऑन-स्क्रीन नाट्यही रंगात आले आहे – जागृति (रचना मिस्त्री) आता कलिकांतविरुद्ध ठाम भूमिका घेण्यास तयार आहे आणि त्याच्या चुकीच्या कृत्यांचा शेवट करण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे आगामी भागांमध्ये अनेक नवीन वळण पाहायला मिळणार आहेत.
अधिक जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘जागृति – एक नयी सुबह’, दररोज रात्री 8.30 वाजता फक्त झी टीव्हीवर!