Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मिथून, पलक आणि 60 वादकांनी मारूती सुझुकी प्रस्तुत झी सिने अॅवॉर्ड्‌स 2025 मध्ये निर्माण केला सिनेमॅटिक मूमेंट

 मिथून, पलक आणि 60 वादकांनी मारूती सुझुकी प्रस्तुत झी सिने ॲवॉर्डस 2025 मध्ये निर्माण केला सिनेमॅटिक मूमेंट

~100 वर्षांच्या सिनेमॅटिक वारशाला भावस्पर्शी आदरांजली वाहत त्यांनी स्वर्गीय राज कपूर आणि मनोज कुमार यांच्या कालातीत योगदानासाठी केला सन्मान~



भारतीय सिनेमाकडे प्रकाशाचा झोत पुन्हा एकदा वळला असून झी आपल्या मारूती सुझुकी प्रस्तुत 23 वे झी सिने अॅवॉर्ड्‌स 2025 घेऊन येत आहेत. गेल्या वर्षाची परिभाषा करणाऱ्या कथा, सितारे आणि चैतन्याला भव्य आदरांजली ह्या सोहळ्‌यामधून वाहण्यात आली. ह्यावर्षी मंच केवळ सिताऱ्यांसाठी राखीव नसून तो तेवढाच चाहत्यांसाठीही आहे. सर्वांत मोठ्‌या फॅन्टरटेनमेंट नाईट ऑफ दि यर मध्ये ही संध्या स्टारडम आणि फॅनडम यांचा एक अनोखा मिलाफ बनली, जिथे जे सिनेमा बनवतात आणि जे त्याचा आनंद लुटतात असे दोहों एकाच छताखाली आपली जादू दाखवण्यासाठी एकत्र येतात.



त्या संध्येचा सर्वात भावस्पर्शी क्षण म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील महान दिग्गज — स्व. राज कपूर आणि मनोज कुमार — यांना समर्पित एक भव्य संगीत श्रद्धांजली होती, जी त्यांच्या अद्वितीय वारशाच्या शतकी वर्षपूर्तीचे स्मरण करणारी होती.



पॉवर कपल - संगीतकार मिथून आणि मनस्पर्शी पार्श्वगायिका पलक मुच्छल या लोकप्रिय जोडीने मंचावर जबरदस्त मेडली सादर करून सर्व पिढ्यांना जोडणारा एक अद्वितीय अनुभव दिला. 60 वादकांचा भव्य वाद्यवृंद आणि लाईव्ह कॉयरच्या साथीने सादर केलेली ही श्रद्धांजली, चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाला समर्पित होती. यात अजरामर गाणी आणि अंतःकरणाला भिडणारी सादरीकरणे होती, जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. हा केवळ एक परफॉर्मन्स नव्हता — तर संगीताच्या वैश्विक भाषेतून साकारलेला सिनेमाच्या वारशाचा एक भावुक उत्सव होता.



मिथून म्हणाला, “हा परफॉर्मन्स केवळ एक श्रद्धांजली नव्हता — तर एक अतिशय खासगी प्रवास होता. राज कपूर आणि मनोज कुमार सर हे केवळ आपल्या इंडस्ट्रीसाठीच नव्हे, तर माझ्यासाठीही प्रचंड प्रेरणादायी राहिले आहेत. एक संगीतकार म्हणून मी त्यांचे चित्रपट आणि त्यातील अविस्मरणीय संगीत यांमध्ये लहानाचा मोठा झालो. मला अजूनही आठवतंय, माझ्या बाबांसोबत त्या सुरांमध्ये मी हरवून जायचो. आम्ही मनापासून तयार केलेल्या मेडलीद्वारे त्यांच्या वारशाला सन्मान देणे — आणि तेही पलकसोबत — हा अनुभव खूपच खास होता. आणि हा आम्हा दोघांचा नवरा-बायको म्हणून एकत्रित पहिला परफॉर्मन्स होता, त्यामुळे ही संध्या आणखीनच अविस्मरणीय ठरली. हवेत एक वेगळीच जादू होती — असं वाटलं की जसे आपण खरंच भारतीय सिनेमाच्या सुवर्णयुगाशी जोडले गेलोय. या अजरामर गाण्यांना माझ्या शैलीत पुन्हा पेश करणे माझ्यासाठी एक आनंददायक अनुभव ठरला.”

पलक म्हणाली, “मी याआधी अनेक स्टेजवर गायले आहे, पण ह्या वेळचा अनुभव काहीसा वेगळाच होता. राज कपूर आणि मनोज कुमार सर यांसारख्या दिग्गजांना श्रद्धांजली अर्पण करणे — ज्यांचे चित्रपट आणि गाणी माझ्या घरी सतत ऐकू येत असायची, विशेषतः शांत रविवारच्या दुपारी — हे अनुभवायला अतिशय भावुक वाटत होतं. मिथूनसोबत, जीवन आणि संगीत या दोन्ही प्रवासातले साथीदार म्हणून, 60 प्रतिभावान वादकांच्या सहवासात हे सादरीकरण करणं तर जणू स्वप्नवत होतं. हा परफॉर्मन्स केवळ गायन नव्हते — तर आम्ही सिनेमा आणि त्याच्या अजरामर सुरांविषयीची ती सामायिक भावना या अधिक मोठ्या गोष्टीचा एक भाग होतो. ही गोष्ट पिढ्यान्‌पिढ्या लोकांना जोडत राहते. हा क्षण मी कायम आपल्या मनात जपून ठेवीन.”



पहा मारूती सुझुकी प्रस्तुत 23 वे झी सिने अॅवॉर्ड्‌स 2025 7 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता, पार्टी तर सुरू होत आहे – क्योंकि जश्न जारी रहेगा 8 जून रोजीसुद्धा  संध्याकाळी 7.00 वाजता झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी5 वर, मिथून आणि पलक मुच्छल यांच्या अविस्मरणीय मनस्पर्शी संगीत परफॉर्मन्ससह!

ही जादू अनुभवणे चुकवू नका – पहा आणि सेलिब्रेशन सुरू ठेवा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.