ZEE5 तर्फे पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज – अंधार माया लाँच
“एक असं कुटुंब जे कोकणातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी परतलं. तिथे ते अशा काही भयावह गोष्टींना सामोरे गेले जिथे वेळ आणि तर्क काही काम करत नाही”
~ एरिकॉन टेलिफिल्म्सची निर्मिती आणि भीमराव मुडे यांची दिग्दर्शन असलेल्या या सीरीजचे 30 मे रोजी ZEE5 वर प्रीमियर ~
राष्ट्रीय, मे 2025 – घरी परत येणं प्रत्येकासाठी सुखद असतंच असं नाही आणि काही दरवाजे तर न उघडलेलेच बरे असतात. ZEE5 वर अंधार माया या पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचा हादरवून टाकणारा थरारक ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाही असंच वाटेल. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी दिग्दर्शित केलेल्या, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत निर्मिती असलेल्या व कथा आणि संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे आहेत आणि पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिलेल्या या सीरीजमध्ये दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेले जबरदस्त अभिनेते किशोर कदम गूढ भूमिकेत दिसतील. एका कुटुंबाच्या भूतकाळाने ग्रासलेल्या पूर्वजांच्या घरात घडणारी अंधार मायाची गोष्ट कोकणात लपलेली भीती आणि घाबरवणाऱ्या एका शोधाची आहे. रहस्य, गूढरम्य वातावरण आणि भावनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सीरीजचे प्रीमियर 30 मे रोजी ZEE5 वर होणार आहे.
कोकणातल्या गूढ, काळोख्या, पछाडलेल्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात लपून गेलेला, एकेकाळी अभिमानाचा विषय असलेला खातू कुटुंबाच्या पूर्वजांचा वाडा सगळ्यांना एका अंतिम विधीसाठी परत आणतो, मात्र या वाड्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. सगळ्यांची पुन्हा झालेली एक सुंदर भेट म्हणून सुरू झालेला हा प्रवास गडद होत जातो. कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे वर येतात आणि आणि विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. जसजसे सावल्या ढवळून निघतात आणि भूतकाळ वर्तमानात प्रवेश करतो, तसतसे विचित्र घटनांची एक स्ट्रिंग त्यांचे वास्तव उलगडते. वाड्याची पकड घट्ट होत जाते तसंच काळाच्या चक्राची पुनरावृत्ती होते. कुटुंबातले सदस्य गायब व्हायला लागतात. वाडा पछाडलेला असतो का? की तो स्वतःच्याच वंशांवर जगत असतो? घर स्वतःचे अस्तित्व परत मिळवत आहे का, किंवा काहीतरी अधिक भयावह आहे?
एका कुटुंबाचं हे घर सुंदर, सडत चाललेला तुरुंग बनत आहे का? आणखी जाणून घेण्यासाठी अंधार माया पाहा, फक्त ZEE5 वर.
https://www.youtube.com/watch?v=MPJ6PshEirU
व्ही. आर. हेमा, प्रमुख चॅनेल ऑफिसर – झी मराठी आणि व्यवसाय प्रमुख - ZEE5 मराठी म्हणाले, ‘ही तर केवळ सुरुवात आहे. अंधारमाया ही पहिली मराठी ओरिजनल हॉरर सीरीज ZEE5 वर लाँच करताना झी ला अभिमान वाटत आहे. या नव्या, बोल्ड सीरीजच्या माध्यमातून आम्ही ओटीटी विश्वात नवं पाऊल टाकलं आहे. आम्ही कायम नाविन्यावर भर दिला आहे. झी मराठीसह महाराष्ट्रातील पहिले खासगी जीईसी लाँच करण्यापासून झी टॉकीज आणि झी स्टुडिओजच्या माध्यमातून सिनेमा क्रांती घडवत आम्ही सातत्याने मराठी मनोरंजन विश्वाला नवा आयाम दिला. आता आम्ही डिजिटल पातळीवरही हाच वारसा आपली संस्कृती, गोष्टी, लोकांच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहोत. कोकणातल्या गूढ पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अंधारमायामध्ये लोककथा, कौटुंबिक नाती आणि मानसशास्त्रीय रहस्यांनी परिपूर्ण गोष्ट पाहायला मिळणार आहे. यातून स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या कथा आणि सर्जनशील गुणवत्ता दाखवण्याची आमची बांधिलकी दिसून आली आहे. ही एका नव्या, सशक्त अध्यायाची सुरुवात आहे – ज्यातून महाराष्ट्राची स्वप्नं आणि आवाज प्रत्येक स्क्रीनवर, सर्वत्र जिवंत होणार आहे.’
एरिकॉन टेलिफिल्म्सचे निर्माते म्हणाले, ‘अंधारमाया ही सीरीज आमच्यासाठी खूप खास आहे. यात भावना, रहस्य आणि खऱ्याखुऱ्या मानवी सत्यावर आधारित असलेली गोष्ट मांडण्यात आली आहे. निर्माते या नात्याने मराठीतली अशाप्रकारची लक्षणीय सीरीज ZEE5 सारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर लाँच होणं समाधानकारक आहे. हा विक्रमी टप्पा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील मराठी कंटेंटसाठी नवी सुरुवात ठरेल, शिवाय त्यातून अर्थपूर्ण, दर्जेदार सीरीज प्रेक्षकांना देण्याची आमची बांधिलकीही अधोरेखित होत आहे. प्रेक्षकांनी अंधारमाया सीरीज पाहावी म्हणून मी उत्सुक आहे.’
दिग्दर्शक भीमराव मुडे म्हणाले, ‘अंधार माया या सीरीजमध्ये एक घट्ट मुळं असलेलं, पण अतिशय अपरिचित वाटणारं जग उभं करण्यात आलं आहे, जिथं भावना, आठवणी आणि अनैसर्गिक यांचं एकत्रित अस्तित्व आहे. ट्रेलर लाँच करताना या दुनियेचं पहिलं दार उघडल्यासारखं वाटलं. ही सीरीज सर्वांसमोर सादर करताना आनंद होत आहे. ही गोष्ट भूतकाळातल्या भूतांची आहे, तितकीच ती आपल्यात लपलेल्या भीतीचीही आहे. कोकणातला गूढरम्य निसर्ग नेत्रसुखद आणि भावनांनी परिपूर्ण गोष्ट मांडण्यासाठी योग्य पार्श्वभूमी देणारा होता. मला आशा आहे, की प्रेक्षक या सीरीजमध्ये गुंतून जातील, हेलावतील आणि पूर्ण वेळ थरार अनुभवतील, कारण या सीरीजमध्ये काय पाहायला मिळणार आहे याची ही फक्त एक झलक आहे.
या ट्रेलरविषयी अभिनेते किशोर कदम म्हणाले, ‘अंधार माया मालिकेत गोन्याची व्यक्तीरेखा करणं हा माझ्या करियरच्या सुंदर प्रवासातला सर्वात भीतीदायक टप्पा होता. तो मोजकं बोलतो, पण त्याच्या आत कित्येक शतकांची शांतता आणि रहस्यं दडलेली आहेत. ट्रेलरमध्ये आम्ही उभारलेल्या विश्वाची झलक दिसते, पण विश्वास ठेवा, खरा थरार गोष्ट उलगडायला लागल्यानंतर सुरू होईल. ही गोष्ट भावनाप्रधान, अस्वस्थ करणारी आणि प्रत्येक क्षणाला धडधड वाढवणारी आहे. भीमराव मुडे आणि त्यांच्या मेहनती टीमबरोबर काम करणं आणखी खास होतं. ही सीरीज नेहमीच्या हॉरर सीरीजसारखी नाही – ती रेंगाळते, कुजबुजते आणि तुमच्या आत दडून राहाते. आमच्या विश्वात पाऊल टाकल्यानंतर प्रेक्षक कसे प्रतिसाद देतात हे पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’
अंधार मायाचं थरारक रहस्य उलडणार 30 मे रोजी फक्त ZEE5 वर
