*VK म्हणजेच विचारकर हा भारतातील पहिला हेल्थकेअर ब्रँड मॅस्कॉट!*
*सत्यजीत रामदास पाध्ये याच्या पुणेरी कॅरॅक्टर VK ने जिंकली लोकांची मने*
*सोशल मीडियावार AK आणि VK जोडीची धमाल*
शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजीत रामदास पाध्ये यांनी भारताचा पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट — विचार कर अर्थात VK हा सह्याद्री हॉस्पिटल्ससाठी तयार केला आहे. हा पुणेरी कॅरॅक्टर त्याच्या खास मिश्कील आणि तडफदार शैलीतून लोकांचे मनोरंजन करतो.
या प्रवासात VK सोबत आहेत आपले लाडके अभिनेते अनिल कपूर अर्थात (AK)! “The AKVK Show” मधून AK आणि त्याचा हुशार व पुणेरी शैलीत बोलणारा मित्र VK विविध विषयांवर चर्चा करून प्रेक्षकांना माहिती देतात, तेही विनोद आणि सहज संवादातून! या खास सिरीजमध्ये सत्यजीत आणि त्यांची टीम — कौस्तुभ आणि कैलाश यांनी अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत ८ विशेष व्हिडिओंचे शूटिंग केले आहे. AK आणि VK यांच्यातील धमाल गप्पांची केमिस्ट्री बघायला प्रेक्षकांना आवडत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
*Link for Reference*
https://www.instagram.com/p/DJwIWb5tOcS/?igsh=cDM0NTJkY2k5N254