*‘मॅन ऑफ मासेस’ NTR आणि मास्टरस्टोरीटेलर प्रशांत नील यांच्या बहुचर्चित बिग बजेट प्रोजेक्टबद्दल समोर आली महत्त्वाचा अपडेट!*
*सोशल मीडियावर केली शेअर पोस्ट*
जगभरात आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी ओळखले जाणारे ‘मॅन ऑफ मासेस’ NTR यांनी ‘KGF’, ‘सालार’ यांसारख्या सुपरहिट अॅक्शन ब्लॉकबस्टर्स देणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत एकत्र येऊन ज्या सिनेमावर काम सुरू केलं आहे – तो #NTRNeel प्रोजेक्ट याआधीच लॉन्च करण्यात आला होता आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील होती. या बहुप्रतीक्षित अॅक्शन थ्रिलरची शूटिंग वेगात सुरू आहे.
*NTR च्या वाढदिवसावर ‘वॉर 2’ चा स्फोटक अपडेट; #NTRNeel साठी वाट पाहा थोडीशी!*
२० मे रोजी NTR चा वाढदिवस असून, चाहत्यांनी या दिवशी #NTRNeel बाबत एक मोठा अपडेट मिळेल अशी आशा बाळगली होती. मात्र निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की, या दिवशी ‘वॉर 2’ चा बहुप्रतीक्षित अपडेट येणार असल्याने, त्यांनी #NTRNeel चे कंटेंट नंतरच्या शुभदिनी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे, "आम्हाला माहीत आहे की, तुम्ही या माणसाच्या वाढदिवसाची वाट किती आतुरतेने पाहत आहात… पण #WAR2 चं कंटेंट येत असल्यामुळे हा क्षण त्यांनाच देणे योग्य ठरेल…आणि #NTRNeel चा MASS MISSILE GLIMPSE आपण थोडं पुढे जाऊन देणार आहोत 🤗🔥 या वर्षीचा वाढदिवस पूर्णतः समर्पित आहे #WAR2 ला आणि आपल्या NTR ला."
‘NTRNeel’ – मास अॅक्शन थरार जो गगनाला भिडणार आहे.
प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा अॅक्शन-एपिक सिनेमा २५ जून २०२६ रोजी जगभरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि इतर भाषांमधून विविध प्रेक्षकवर्गांपर्यंत पोहचणार आहे. या सिनेमात NTR एका शक्तिशाली भूमिकेत झळकणार असून, प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांचा नवा अवतार पाहायला मिळणार आहे. ‘NTRNeel’ मध्ये अॅक्शन आणि कथानक यांचे स्फोटक मिश्रण पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हा सिनेमा २०२६ मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक ठरणार आहे.
प्रशांत नील यांच्या खास 'मास व्हिजन'मुळे NTR च्या स्क्रीनप्रेझेन्सला नवे उंची मिळणार आहे. मायथ्री मूव्ही मेकर्स आणि NTR आर्ट्स या नामवंत प्रोडक्शन हाऊसेसच्या सहकार्याने या सिनेमाचे भव्य निर्मिती सुरू आहे.
*इंस्टाग्राम लिंक:* https://www.instagram.com/p/DJvnjIFT1_T/?igsh=MXBmOGk2bzQyd2RpNw==