Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*८ मे रोजी आनंद शिंदेंच्या बुलंद आवाजात रंगणार 'मेळा मनोरंजनाचा'*

 *८ मे रोजी आनंद शिंदेंच्या बुलंद आवाजात रंगणार 'मेळा मनोरंजनाचा'*

 

'सन मराठी' प्रस्तुत 'मेळा मनोरंजनाचा' हा कार्यक्रम ८ मे  २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, महाजन वाडी, मिरा रोड पूर्व, ठाणे येथे पार पडणार आहे. 'सन मराठी' वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 'सन मराठी' प्रस्तुत 'मेळा मनोरंजनाचा' हा कार्यक्रम मुंबईमध्ये राबवण्यात येणार आहे. 'मेळा मनोरंजनाचा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिग्दर्शक- अभिनेता हेमंत ढोमे करणार असून महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजेच सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बहारदार गाण्यांनी या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढणार आहे. 



'मेळा मनोरंजनाचा' या कार्यक्रमात संगीत, नृत्य, असा मनोरंजनाचा नजराणा असणारच आहे. पण याचबरोबर 'सन मराठी'च्या कलाकारांना भेटण्याची संधी तसेच त्यांच्या बरोबर धमाल गप्पा, सेल्फी काढण्याचा चान्स मिळणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन इथेच थांबणार नाही तर अभिनेत्री योगिता चव्हाणची दिलखेचक अदा व प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी माधुरी पवारची धडाकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे. नवी मुंबई मधील सुप्रसिद्ध गायिका सोनाली सोनावणेच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांनाही थिरकायला मिळणार याचसह रिलस्टार रितेश कांबळेचा सुपर डान्स पाहायला मिळेल. तसेच 'सन मराठी' वाहिनीवरील  'जुळली गाठ गं' या मालिकेतील धैर्य-सावी आणि 'हुकुमाची राणी ही' या नव्या मालिकेतील राणी- इंद्रजीत या सुपरहिट जोड्यांचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. 


मुंबईमध्ये पहिल्यांदाच 'सन मराठी' प्रस्तुत 'मेळा मनोरंजनाचा' हा कार्यक्रम येत्या ८ मे  २०२५ रोजी, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, महाजन वाडी, मिरा रोड पूर्व, ठाणे येथे  सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तर या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी कोणताही शुल्क आकारण्यात आलेल नसून प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्याचबरोबर प्रवेशाधिकार राखीव असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. तुम्ही या बातमीचा फोटो काढूनही पास म्हणून वापरू शकता. चला तर मग मंडळी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि ८ मे ची सायंकाळ खास बनवा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.