*"महिषासुर आई तुळजाभवानी समोरासमोर; महिषासुराचं देवीसमोर गूढ कोडे"*
‘आई तुळजाभवानी ’, सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई १२ मे, २०२५ :* कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेने अध्यात्म, शक्ती आणि स्त्रीशक्ती यांचं प्रभावी चित्रण करत महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनात ठसठशीत जागा निर्माण केली आहे. देवीच्या भक्ताचा श्वास रोखून धरणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आता मालिकेत येणार आहे. आई तुळजाभवानी आणि महिषासुर समोरासमोर येणार आहेत. मालिकेच्या आगामी भागात, आपल्याला एक अत्यंत नाट्यमय आणि रहस्यमय प्रसंग पाहायला मिळणार आहे. महिषासुर गावकरी वेशात देवीच्या दरबारात येणार आहे आणि देवीच्या समोर एक असं कोडे मांडतो, ज्यामध्ये शब्दांतच एक गूढ रहस्य लपलेले आहे. हे केवळ कोडं नाही, तर देवीला दिलेले बौद्धिक आव्हान आहे. नक्की हे काय आहे ? आणि महिषासुराचा या मागे हेतू काय आहे ? हे लवकरच कळेल. जाणून घेण्यासाठी नक्की पहा ‘आई तुळजाभवानी ’, सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
महिषासुर ज्या पद्धतीने उपहासात्मक शैलीत देवीसमोर उभा राहतो, ती भेट आपल्याला केवळ एक शत्रू आणि एक देवी यांच्यातील वैर म्हणून पाहता येणार नाही. इथे प्रश्न आहे असुरी आणि दैवी वृत्तीचा त्यांच्यातल्या सनातन संघर्षाचा. यामुळे ‘देव’ आणि ‘असुर’ या पारंपरिक सीमारेषा विस्कटून नवे प्रश्न निर्माण होतात – "कोण देव आणि कोण असुर?", "रूप बदललं की ओळख बदलते का? असे असंख्य प्रश्न निर्माण करणारा हा कथाभाग आहे,.
नक्की पहा ‘आई तुळजाभवानी ’, सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.