"स्विमसूटमधील ती बॉडी मिळवण्यासाठी कियाराने प्रचंड मेहनत घेतली!" – अनाइता श्रॉफ अदजानिया
वॉर 2 चा टीझर काल प्रदर्शित झाला आणि लगेचच इंटरनेटवर खळबळ माजली. ऋतिक रोशन आणि एनटीआर यांचे धडकी भरवणारे अॅक्शन सीन्स जितके चर्चेत आले, तितकीच लक्षवेधी ठरली कियारा अडवाणीची झलक—एक अत्यंत हॉट, नियॉन लाइम ग्रीन बिकिनीमधील एंट्री!
या लूकमुळे सोशल मीडियावर थेट जल्लोष झाला, आणि या लूकचे संपूर्ण श्रेय जाते भारतातील प्रसिद्ध स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ अदजानिया यांना.
अनाइता म्हणते ,"हे माझं कियारासोबतचं पहिलं फिल्म कोलॅबरेशन होतं, आणि ब्रीफ एकदम स्पष्ट होतं—'हॉट लूक हवाय!' मी आधीही बऱ्याच चित्रपटांत स्विमसूट्स स्टाईल केले आहेत, पण यावेळी मला कियारासाठी अगदी नैसर्गिक, रिलॅक्स्ड लूक हवा होता—जसा आपण समुद्रकिनारी असतो, कोणत्याही आत्मसंदेहाशिवाय, सहज आणि नितळ!"
शूटिंगवेळीचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, "मी तिला सारखं म्हणत होते—'स्वतःमध्ये राहा, काही दाखवायची गरज नाही'. असं काहीतरी जास्त मस्त आणि खरं वाटतं, जेव्हा एखादी अभिनेत्री कशातही वावरते—स्वत:साठी, अभिनयासाठी नाही."
त्या पुढे म्हणतात, "मी तिच्यासाठी एक अनपेक्षित रंग निवडला—ना अगदी हिरवा, ना अगदी पिवळा. काहीतरी वेगळंच, लक्ष वेधून घेणारं. हा रंग फक्त तिला शोभून दिसू शकतो."
बिकिनी डिझाइनबद्दल सांगताना त्या म्हणतात,"कट अतिशय साधा आहे, पण पुढून पाहिल्यावर एक गोड आश्चर्य मिळतं—मध्यभागी एक आकर्षक 'बिकिनी चार्म' लावला आहे. त्यात एक थोडंसं गंमतीशीर आणि थोडंसं रहस्यमय असं मिश्रण आहे.""आणि अर्थातच, ती मेटॅलिक चमक—जणू काही डिस्को युगात गेल्यासारखं वाटतं. पण हेच एकदम फ्रेश आणि आजच्या जनरेशनचं वाटतं—बोल्ड, ट्रेंडी आणि स्टायलिश!"
शेवटी अनाइता म्हणते "हा लूक कियारा इतका ग्लॅमरस दिसतो, कारण तिने त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ती इतकी सहज होती की तिला काही विचार करावा लागला नाही. त्या शरीराचं श्रेय फक्त तिलाच जातं. मी फक्त त्याला उठाव देण्याचं काम केलं."
'वॉर 2', यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावी ब्लॉकबस्टर फिल्म असून, ती १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक आयान मुखर्जी आणि निर्माते आदित्य चोप्रा आहेत.