Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आई तुळजाभवानीचे भविष्य सटवाई लिहिणार!*

 *आई तुळजाभवानीचे भविष्य सटवाई लिहिणार!*

पहा आई तुळभवानी मालिकेत सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



*मुंबई 31 मे, 2025:* कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. त्याचे कारण आई तुळजाभवानीने महिषासुराच्या अंताच ध्यास घेऊन घेतलेले बालरूप. दैवी लीला काहीवेळा अनाकलनीय ठरते.गूढ वाटू लागते. अशीच काहीशी परिस्थिती सध्या आहे ती सटवाईची, बालरुपातल्या तुळजाचे मानवी रुपातले भविष्य ती काय लिहणार, हा पेच तिच्यासमोर आहे आणि साऱ्या त्रैलोक्याचे लक्ष त्यावर आहे. तिकडे दैवी शक्ति बाळरूपात असल्याचे स्पष्ट संकेत महिषासुराला मिळाले असले तरी, त्याचा उन्मत स्वभाव ते संकेत कळूनही मान्य करायला तयार नाही, तुळजाला प्राप्त करणे हा एकच ध्यास त्याने घेतला आहे.त्यासाठी माझे भविष्य मी घडवणार हा त्याचा गर्व सध्या जास्त प्रबळ आहे.



एखाद्याच्या ललाटी भविष्य लिहणे म्हटले तर सोप्पे काम, इथे मात्र ते प्रचंड गुंतागुंतीचे ठरत आहे. त्यातली उलगडत जाणारी लीला मात्र तितकीच विलक्षण आश्चर्यकारक ठरणार आहे, जी थेट महिषासुराच्या अंताची सुरुवात ठरेल. तेव्हा चुकवू नका, बालरुपातल्या तुळजाभवानीचे मानवी रुपातले भविष्य लिहणाऱ्या देवी सटवाईची गोष्ट आई तुळभवानी मालिकेत सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.