*जेव्हा १० नवोदित कलाकारांनी पाहिला स्वतःचा पहिला ट्रेलर, भावनांनी भरलेला अविस्मरणीय क्षण!*
सितारे जमीन पर येणार २० जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस
आमिर खान यांच्या ‘सितारे जमीन पर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आणि प्रेम दिसून येत आहे. २००७ मधील सुपरहिट ‘तारे जमीन पर’चा हा स्पिरिच्युअल सिक्वल, प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेली एक हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन येत आहे.
चित्रपटात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. जेव्हा या नव्या चेहऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत स्वतःचा पहिला ट्रेलर बघितला, तेव्हा तो क्षण हास्य, आनंदाश्रू आणि अपार प्रेमाने भारलेला होता – जणू एखादं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं.
हे सर्व नवोदित कलाकार आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते, जिथे त्यांनी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला. त्यांच्या मेहनतीचं प्रतिबिंब पडद्यावर झळकताना पाहून, सगळं वातावरण जणू जादूने भरून गेलं. टाळ्यांचा कडकडाट, आनंदाश्रू, आणि प्रेरणादायी क्षणांनी त्या ऑफिसमध्ये एक अविस्मरणीय उत्सवाचं रूप धारण केलं. दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी त्या क्षणी जोशात एकच नारा दिला – "सितारेरेरेरे!" – आणि तो क्षण सर्वांच्या मनात कोरला गेला.
स्वतःच्या मुलांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहणं हे त्यांच्या पालकांसाठी एक स्वप्न साकारल्यासारखं होतं. त्यांच्या डोळ्यांत गर्व, आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. सर्व पालकांनी आमिर खान आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. त्या क्षणी जे प्रेमळ आलिंगन, अश्रूंनी ओथंबलेली दृश्यं आणि हृदयस्पर्शी वातावरण तयार झालं, ते खरोखरच अमूल्य होतं.
🔗 *इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघा:* [Reel Link](https://www.instagram.com/reel/DJqwf87oSha/?igsh=Y2pkcjF3MGVrdWg0)