Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'आदिशक्ती' मालिकेतील शिवाने शेअर केला फिटनेस फंडा*

 *'आदिशक्ती' मालिकेतील शिवाने शेअर केला फिटनेस फंडा* 



'सन मराठी' वरील 'आदिशक्ती' या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असताना शक्तीने भद्रा व प्रिन्सचा खोटा चेहरा  गावकऱ्यांसमोर आणला आहे. आतापर्यंत भद्रा व प्रिन्सने मिळून गावकऱ्यांची जमीन लुबाडली, बरेच नरबळी दिले आहेत. हे सगळं शक्तीने गावकऱ्यांसमोर आणल्यावर भद्रा व प्रिन्सच्या गळ्यात चपलांचा हार घालत त्यांची धिंड काढली आहे. आता मालिका एका रंजक वळणावर आली असून यापुढे प्रिन्स व भद्रा कोणती नवी खेळी खेळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेत शिवाची भूमिका साकारणारा अभिनेता अतुल आगलावेने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली असून  त्याला  फिटनेसचं खूप वेड आहे. नुकतंच अतुलने त्याचा फिटनेस फंडा चाहत्यांसह शेअर केला आहे.  


फिटनेस बद्दल सांगताना अतुल म्हणाला की, " सध्या आदिशक्ती या मालिकेत मी शिवा ही भूमिका साकारत आहे. उत्तम शरीरयष्टी  असणं या भूमिकेची गरज होती. पण मला स्वतःला फिट ठेव्य्ण्याचं वेड आहे. या बद्दल सांगायचं झालं तर, मी दहावी झाल्यावर ठरवलं की आता स्वतःकडे लक्ष द्यायचं. मग मी घरातच व्यायाम सुरू केला. माझ्या मामामुळे मला व्यायामाची आवड निर्माण झाली. ते स्वतः फिट आहेत आणि त्यांच्या सवयी पाहून मलाही प्रेरणा मिळाली. सुरुवातीला डायट म्हणजे काय, हे मला माहितीच नव्हतं. गोड खूप आवडायचं, त्यामुळे भूक लागली की मी काहीही खायचो. त्यामुळे थोड्या काळात वजन वाढलं. तेव्हा लक्षात आलं की फक्त व्यायाम करून चालत नाही, खाण्यावरही तितकंच लक्ष द्यायला हवं.नंतर मी जिम जॉइन केली. तिथे गेल्यावर खूप काही शिकायला मिळालं – डायट, योग्य व्यायाम, आणि शिस्त. जिम सुरू करताना माझं वजन होतं ८२ किलो. मेहनत घेतली, योग्य खाल्लं, आणि फक्त ४ महिन्यांत १८ किलो वजन कमी केलं. तेव्हापासून आजपर्यंत माझं वजन ६४ किलोच आहे."



पुढे  म्हणाला,"सध्या मी मालिकेत काम करतोय. शूटिंग १२-१५ तास चालतं, पण तरी शक्य झालं की जिमला जातो. आता माझ्या डायटमध्ये काय खायचं आणि किती खायचं हे अगदी ठरलेलं असतं – चिकन, अंडी, सलाड, ग्रीन टी. साखर आणि मीठ जवळजवळ बंद केलंय. आपण वजन का कमी करतोय , हे लक्षात ठेवलं की सगळं सोपं होतं. मी अभिनेता आहे, आणि एक अभिनेता म्हणून फिट असणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवतो. कधी कधी cravings येतातच – मटण, रस्सा, बिर्याणी, मोमोज, आणि आईच्या  हातची पुरणपोळी – यांना नाही म्हणणं खरंच अवघड जातं. पण जेव्हा मी आवडीचे पदार्थ खातो तेव्हा दुप्पट व्यायामही करतो कारण शेवटी फिट राहणं हेच माझं ध्येय आहे.मला प्रेक्षकांना ही हेच सांगायला आवडेल की, स्वतःवर प्रेम करा, आयोग्याची  काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि 'आदिशक्ती' ही तुमची आवडती मालिका दररोज रात्री ९ वाजता पाहायला विसरू नका आपल्या 'सन मराठी'वर. "

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.