*अभूतपूर्व स्वामी चमत्कार घडणार,कृष्णाची गोष्ट अनपेक्षित वळण घेणार*
पहा जय जय स्वामी समर्थ BLOCKBUSTER रविवार १ जून दु. २ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
मुंबई २९ मे, २०२५ : कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा एक क्षण उलगडणार आहे.गणिकेची मुलगी असलेली दत्तभक्त कृष्णावर गावकऱ्यांनी चारित्र्यहननाचे आरोप करत थेट तिच्या मृत्युदंडाची मागणी केली आहे. गावाची पंचायत, गावकरी आणि त्याच्या भयंकर रागाला सामोरी जाणारी कृष्णा विवशतेने ढासळते आणि स्वामींकडे मागणी करते, “माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले... मला बदनाम केलं... माझी पात्रताच नाही जगण्याची. मला मृत्युदंड द्या.” अशा स्थितीत कृष्णा थेट देवीच्या मूर्तीपाशी धाव घेते, तिथून त्रिशूळ उचलते आणि तो स्वतःच्या पोटात खुपसते आणि त्याचक्षणी स्वामी लीला घडते आणि स्वामी समर्थांचा आवाज घुमतो “जे आयुष्य आमच्या चरणी वाहिलंस ते संपवण्याचा अधिकार तुला दिला कुणी?” कृष्णा अवाक होऊन आजूबाजूला पाहते.
मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुरुषभर उंचीच्या दत्त चिन्हांचं तेजस्वी प्रकट रूप दिसू लागतं. दिगंबरा दिगंबरा चा जप घुमत असताना ही सर्व चिन्हं एकत्र येऊन,तेजाच्या लहरीतून स्वामी समर्थ प्रकट होतात आणि जाहीर घोषणा करतात, “तुझी पात्रता तुला आणि गावाला आम्ही दाखवतो”. स्वामींची ही घोषणा या कथानकाला एक वेगळंच वळण देते आणि संपूर्ण गावाला हादरवून टाकणारं सत्य पुढे आणण्याचा संकेत देते. पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ BLOCKBUSTER रविवार १ जून दु. २ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
या भागात अध्यात्म, नाट्य आणि भावनांची प्रचंड तीव्रता अनुभवायला मिळणार आहे. कृष्णाच्या पात्रतेवर उठलेले प्रश्न, तिचा आक्रोश, आत्मसमर्पणाचा निर्णय आणि स्वामी समर्थांचा चमत्कारिक हस्तक्षेप हे सगळं प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजणारं ठरणार आहे.आजवर कधीही न घडलेला चमत्कार घडणार आहे. जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतील हा भाग प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.