चार वर्षांच्या प्रवासानंतर स्मिता बन्सल यांनी ‘भाग्य लक्ष्मी’ला भावनिक निरोप दिला!
लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका ‘भाग्य लक्ष्मी’मध्ये नीलम ओबेरॉयची सशक्त भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता बन्सल आता या मालिकेला निरोप देत आहेत. गेल्या चार वर्षांत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या तिच्या या भूमिकेचा समारोप हा मालिकेच्या आणि प्रेक्षकांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्मिता यांनी 2021 मध्ये या मालिकेत प्रवेश केला होता. पारंपरिक मूल्ये, सत्ता आणि भावना यांच्या मधोमध उभी असलेली एक कणखर पण प्रेमळ मातृशक्ती म्हणून नीलमची भूमिका लवकरच कथानकाचा केंद्रबिंदू ठरली. अनेक पिढ्यांतील बदल, तीव्र कौटुंबिक संघर्ष अशा अनेक कथांमध्ये स्मिता यांनी आपल्या अभिनयात गंभीरता आणि सुस्पष्टता दाखवली. त्यामुळे त्यांची या मालिकेतून एक्झिट होणे हे भावनिक आणि कथानकाच्या दृष्टीनेही मोठे पाऊल आहे.
स्मिता म्हणाल्या, “भाग्य लक्ष्मी ही मालिका नेहमीच माझ्या मनात खास स्थान राखेल. या चार वर्षांच्या काळात मला एका सुंदररित्या लिहिलेल्या पात्राला साकारण्याची संधी मिळाली, तसेच सेटवर मी एक नवीन कुटुंब मिळवले. हा सेट माझे दुसरे घर बनले आणि येथे सर्वजण माझे जवळचे आप्त झाले. प्रॉडक्शन हाऊस आणि क्रिएटिव्ह टीममुळे माझा प्रवास खूपच सुखद झाला. नीलमचे पात्र मला खूप शिकवून गेले, मला प्रेरणा दिली, कलाकार म्हणून समाधानी वाटणारा अनुभव दिला. झी टीव्हीवर तब्बल 18 वर्षांनंतर काम करणे एक विलक्षण अनुभव होता.”
आता स्मिता आपल्या करिअरच्या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना, त्यांचे चाहते मात्र त्यांच्या प्रभावी अभिनयाला नक्कीच मिस करतील. येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे – लक्ष्मीवर (ऐश्वर्या खरे) नीलमच्या खुनाचा आरोप होतो आणि पोलिस तिला अटक करतात. हा रिषी (रोहित सुचांति) आणि लक्ष्मीच्या प्रेमकथेचा शेवट आहे का? की रिषी सत्याचा शोध घेऊन लक्ष्मीला वाचवेल?
हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा 'भाग्य लक्ष्मी', दररोज संध्याकाळी 8 वाजता, फक्त झी टीव्हीवर!