Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पात्र एक, रुपं अनेक...घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्याचा नवा लूक

 पात्र एकरुपं अनेक...घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्याचा नवा लूक

मालिकेत दिसणार क्युटूच्या रुपात

 


कलाकारांसाठी एखादं पात्र साकारणं म्हणजे परकाया प्रवेश असतो. सध्या असाच काहीसा अनुभव घेतेय घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर. मालिकेत सध्या ऐश्वर्या जानकीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा शोध घेतेय. ही कागदपत्र मिळवण्यासाठी तिने ओवीला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. लहान मुलांना काल्पनिक जगात हरवून जायला आवडतं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. कार्टुन्स आणि त्यांच्या जादुई नगरीत हरवणाऱ्या ओवीची ऐश्वर्याने क्युटू या नव्या कार्टुनसोबत भेट घडवून दिली आहे. हा क्युटू बोलतो आणि आपलं सगळं ऐकतो देखिल हे तिने ओवीला पटवून दिलं आहे. त्याबदल्यात जानकीची महत्त्वाची फाईल आणून द्यायची असं तिने ओवीला सांगितलं आहे. क्युटूच्या जाळ्यात ओवी फसणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.




घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या दिसत असलेल्या क्युटू दुसरा तिसरा कुणी नसून ती आहे ऐश्वर्या. क्युटूचा वेष धारण करुन ती ओवीला आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षासाठी हे रुप साकारणं अतिशय आव्हानात्मक होतं. एकतर उन्हाळ्यात ही वेशभूषा करणं म्हणजे मोठी कसरत. त्यात हा पूर्ण सीन गोदामात शूट करण्यात आला त्यामुळे प्रतीक्षाची चांगलीच तारांबळ उडाली. याआधीही प्रतीक्षाने मालिकेत बरेच कठीण प्रसंग शूट केले आहेत. मात्र क्युटू साकारताना खूपच मज्जा आली असं प्रतीक्षा म्हणाली. या क्युटूला आवाजही प्रतीक्षानेच दिलाय. त्यामुळे प्रेक्षकांना पहाताना नक्कीच धमाल येणार आहे. तेव्हा न चुकता पहा घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.