अनुष्का सेनचा नवीन कान्स लूक – सौंदर्य आणि एलिगन्स यांचं परिपूर्ण मिलन*
भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख बनवत असलेली यंग अभिनेत्री अनुष्का सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या मेहनत, अभिनय आणि ग्लॅमरने तरुण पिढीची प्रेरणा ठरलेली अनुष्का सेन 2025 च्या प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर चालत भारताचे नाव उज्ज्वल करत आहे. पहिल्या दिवसाच्या लूकनेच सर्वांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर आता अनुष्काने आपला दुसरा कान्स लूक सादर केला आहे. एक शाही, ग्लॅमरस आणि भारतीय पारंपरिकतेचा आधुनिक संगम दर्शवणारा.
या लूकमध्ये अनुष्काने काळ्या नेटचा शीर ब्लाउज परिधान केला होता, ज्यावर सोज्वळ एंटिक ब्रॉन्झ वर्क आणि चमकदार हँड एम्ब्रॉयडरी होती. ढिली स्लीव्ह्जसह तिचं बॉडिस अत्यंत मोहक आणि रॉयल भासत होतं. या संपूर्ण लूकला तिने एक जड चंदेरी स्कर्टसह पेअर केलं, ज्यामुळे संपूर्ण पोशाखात एक खास पारंपरिक भारदस्तपणा आला होता.
फक्त २२ वर्षांची अनुष्का आज जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे, आणि तिचा हा अंदाज केवळ स्टाईल नव्हे, तर तिच्या कौशल्य, आत्मविश्वास आणि समर्पणाचा झळाळता आरसा आहे. एलिगन्स आणि ग्रेस यांच्या अद्वितीय संगतीसह तिचं हे ग्लोबल स्टाईल स्टेटमेंट खरंच स्तुत्य आहे.
नुकत्याच ओटीटीवर आलेल्या ‘दिल दोस्ती डिलेमा’ आणि ‘किल दिल’ या दोन मालिकांमधून अनुष्काने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. आता तिच्याकडे काही महत्त्वाचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रोजेक्ट्स आहेत, जे तिच्या कारकिर्दीला आणखी उंचीवर घेऊन जाणार आहेत.
यात लवकरच येणाऱ्या कोरियन चित्रपट ‘एशिया’ मधील तिची प्रमुख भूमिका आणि ‘क्रश’ या आगामी इंटरनॅशनल प्रोजेक्टचा समावेश आहे, ज्यात ती साउथ कोरियन ऑलिंपिक पिस्टल शूटिंग स्टार किम ये-जी सोबत झळकणार आहे. या खास कोलॅबोरेशनमुळे अनुष्काचा जागतिक प्रवास अधिक रोमांचक आणि आशादायक ठरत आहे.