तरुणाईचा लाडका गायक अभिजीत सावंत देणार प्रेक्षकांना अनोख्या गाण्याची पर्वणी !
अभिजीत सावंत याच बहुचर्चित "चाल तुरु तुरु" प्रेक्षकांच्या भेटीला ! जुन्या गाण्याची नवी मैफिल जमवण्यासाठी अभिजीत सावंत सज्ज !
आणि म्हणून "चाल तुरु तुरु" हे गाणं केलं - अभिजीत सावंत ! जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्विस्ट देणं आव्हानात्मक - अभिजीत सावंत !
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत सावंत ने चाहत्यांना गोड बातमी देत नवीन गाणं येणार असल्याच सांगितलं आणि आज हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला तो घेऊन आला. बिग बॉस नंतर अभिजीत काय नवीन करणार याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि अश्यातच अभिजीत "चाल तुरु तुरु" हे गाणं घेऊन आला आहे.
गाण्याचा टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता हे बहुचर्चित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला देखील आल. गाण्याची गंमत म्हणजे सगळ्यांचं आवडत गाणं असलेलं "चाल तुरु तुरु" याच रेक्रियेट व्हर्जन अभिजीत ने गायलं आहे आणि पुन्हा एकदा हे गाणं प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहे.
संगीत विश्वात अभिजीत 20 वर्ष देखील पूर्ण करतोय आणि याच निमत्ताने अभिजीत ने चाहत्यांना हे गाणं भेट दिलं असं म्हणणं वावग ठरणार नाही ! कायम प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा अभिजीत आता नवीन गाण्यानं वेगळीच वाईब करेन यात शंका नाही.
नव्या गाण्याची उत्सुकता सांगताना अभिजीत म्हणतो "इंडियन आयडॉल नंतर आज 20 वर्ष या इंडस्ट्रीत पूर्ण होतात आणि हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झाला त्यांच प्रेम आज मला इथवर घेऊन आल आहे. गायक म्हणून कायम वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स साठी काम करण्याची संधी येत असते आणि म्हणूनच "चाल तुरु तुरु" सारख्या एव्हरग्रीन गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन करण्याचं ठरवलं. जुन्या गाण्याला दिलेला नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल यात शंका नाही. 20 वर्षाचा हा प्रवास एखाद्या रोलरकोस्टर राईड सारखा होता एक मराठी मुलगा म्हणून आपल्या महाराष्ट्रात प्रेक्षकांना आणि मराठी इंडस्ट्रीला कायम काहीतरी वेगळं देण्याची इच्छा होती आणि आज या गाण्यामुळे ती पूर्ण होत आहे. बिग बॉस केल्यानंतर मला अनेकांनी विचारलं आता नवीन काय? आणि त्यावर हे उत्तर म्हणजे हे नवीन गाणं ! चाल तुरु तुरु सारख्या जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्विस्ट देणं हे आव्हानात्मक होत पण तेवढंच मजेशीर देखील होत. या गाण्यासाठी मी देखील खूप उत्सुक होतो आणि आज हे गाणं रिलीज होतंय याचा खूप आनंद आहे"
जुन्या गाण्याला नवीन स्वरूप देऊन ते गाणं नव्या रूपात रसिकांसाठी घेऊन येणं ही तारेवरची कसरत करत अभिजीत ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिजीत ने आजवर त्यांचा गाण्यातून रसिकांना मंत्रमुग्ध तर केलं पण येणाऱ्या काळात देखील तो अनेक कमालीची गाणी घेऊन येणार असल्याचं कळतंय !
https://www.instagram.com/reel/DJJF5AoiOgw/?igsh=dWk5eWY0Z3NtajF3