Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाहरुख खान ची ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’च्या लंडनमधील रिहर्सलला अचानक भेट.

 शाहरुख खान ची ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’च्या लंडनमधील रिहर्सलला अचानक भेट.

‘डीडीएलजे’ या ऐतिहासिक ब्लॉकबस्टरवर आधारित संगीत नाटकाच्या यूके प्रीमियर पूर्वी खास क्षण


जगप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि कोट्यवधींना भुरळ घालणारे शाहरुख खान यांनी लंडनमधील ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. १९९५ मध्ये आलेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या हिंदी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’वर आधारित या संगीत नाटकाचा यूके प्रीमियर २९ मे ते २१ जून २०२५ दरम्यान मँचेस्टर ओपेरा हाऊस येथे होणार आहे.


ही नवी रंगमंचीय निर्मिती यूके आणि भारत या दोन पार्श्वभूमींवर आधारित असून, मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा हेच या संगीत नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘डीडीएलजे’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे आणि यंदा त्याला ३० वर्षे पूर्ण होत आहेत.



जेना पंड्या (सिमरनची भूमिका) म्हणाली “शाहरुख खान यांची भेट होणं हे माझ्यासाठी फारच मोठं भाग्य होतं. त्यांनी आमच्या रिहर्सलसाठी वेळ दिला, आमचं कौतुक केलं आणि काही विशेष प्रसंग पाहून त्यावर प्रतिक्रिया दिली – हे सर्व खूप प्रेरणादायक होतं. आता मँचेस्टरमध्ये हे नाटक सादर करण्याची मला उत्सुकता आहे.”


ऍशली डे (रॉज ची भूमिका) म्हणाला “त्यांच्या उपस्थितीत रूममध्ये एक वेगळीच शांत ऊर्जा होती. सर्व कलाकारांशी त्यांनी अगत्याने संवाद साधला. ‘राज’ने ‘रॉज ’ची भेट घेतली, आणि हे क्षण आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले.”

संगीतकार जोडी विशाल-शेखर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.


विशाल ददलानी म्हणाला“शाहरुख यांचा आमच्या वर्कशॉपला भेट देणं, आमच्यासाठी एक अत्यंत आनंददायक अनुभव होता. त्यांनी गाणी, परफॉर्मन्स आणि कलाकारांचे उत्साह यांचं खूप कौतुक केलं. त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला आणि त्यांच्या थिएटरमधील सुरुवातीच्या काळातील आठवणीही शेअर केल्या. आम्हा सर्वांसाठी तो एक अनमोल अनुभव ठरला.”


शेखर रवजियानी म्हणाला “‘कम फॉल इन लव्ह’च्या सेटवर शाहरुख खान यांची उपस्थिती ही एक अनपेक्षित आणि कायम लक्षात राहणारी गोष्ट ठरली. मूळ ‘राज’ला समोर पाहणं हे संपूर्ण टीमसाठी आनंददायक होतं. थिएटर हे शाहरुख यांचं पहिले प्रेम आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होतं.”


कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल मँचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये २९ मे २०२५ रोजी प्रीमियर करणार असून, २१ जून २०२५ पर्यंत चालेल. प्रेस नाईट ४ जून २०२५ रोजी होईल.

या नव्या म्युझिकलमध्ये १८ नवीन इंग्रजी गाण्यांच्या साथीने प्रेम, संस्कृती आणि कुटुंब यांची सुंदर गोष्ट रंगमंचावर सादर केली जाईल.


या म्युझिकलमध्ये जेना पंड्या (भांगडा नेशन, मम्मा मिया) सिमरनच्या भूमिकेत आणि अ‍ॅश्ले डे (अन अमेरिकन इन पॅरिस, डायनेस्टी) राजच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत इरविन इक्बाल (द फादर अँड द असॅसिन) बलदेवच्या भूमिकेत, कारा लेन (द अ‍ॅडम्स फॅमिली) मिंकीच्या भूमिकेत, हर्वीन मान-नेरी (बेंड इट लाइक बेकहम) लज्जोच्या भूमिकेत, अमोनिक मेलाको (ऑस्टनलँड) बेनच्या भूमिकेत, मिली ओ’कॉनेल (सिक्स) कुकीच्या भूमिकेत, अंकुर सभरवाल (स्नेक्स अँड लॅडर्स) अजितच्या भूमिकेत, किंशुक सेन (कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल) कुलजितच्या भूमिकेत, आणि रसेल विलकॉक्स (एग्झिट द किंग) राज सिनियरच्या भूमिकेत असतील.


कलाकारांची टीम पूर्ण करणारे एन्सेंबल सदस्य म्हणजे: एरिका-जेन ऑल्डेन (ए ख्रिसमस कॅरोल: द म्युझिकल), ताश बाकारेस-हॅमिल्टन (फ्रँकी गोज टू बॉलीवूड), स्कार्लेट बेहल (सिंडरेला), सोफी कॅम्बल (सिंगिन’ इन द रेन), गॅब्रिएल कोका (फ्रोज़न: द म्युझिकल), रोहन धुपार (मम्मा मिया!), जो जॅन्गो (ऑल इंग्लंड डान्स गाला), अलेक्झांडर एमरी (लव्ह नेव्हर डाइज), कुलदीप गोस्वामी (भांगडा नेशन), एला ग्रँट (वन्स अपॉन अ टाइम टूर), यास्मिन हॅरिसन (बर्लेस्क), मोहित माथुर (बियॉन्ड बॉलीवूड), टॉम मसल (बर्लेस्क), पूर्वी परमार (लिट्ल शॉप ऑफ हॉरर्स), साज राजा (बेस्ट ऑफ एनिमीज), मनु सरस्वत (केक: द म्युझिकल), गॅरेट टेनेट (मम्मा मिया!), सोन्या वेणुगोपाल (लाईफ ऑफ पाय), आणि स्विंग्स – एमिली गुडइनफ (सनी आफ्टरनून), मरीना लॉरेन्स-माह्रा (द सीक्रेट सिल्क), जॉर्डन मैसुरिया-वेक (पीटर पॅन).


कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल साठी पुरस्कारप्राप्त क्रिएटिव टीममध्ये आहेत:

पुस्तक आणि गीते – नेल बेंजामिन (मीन गर्ल्स – टीना फे सोबत, लीगली ब्लॉन्ड साठी ऑलिवियर पुरस्कार विजेती),

संगीत – विशाल ददलानी आणि शेखर रवजियानी (भारतात प्रसिद्ध जोडी – ‘विशाल-शेखर’),

नृत्यदिग्दर्शन – रॉब अ‍ॅशफोर्ड (टोनी, ऑलिवियर, एमी पुरस्कार विजेते – फ्रोज़न, हाउ टू सक्सीड, इ.),

भारतीय नृत्यांचे सह-नृत्यदिग्दर्शन – श्रुती मर्चंट (लेडीज वि. रिकी बहल, ताज एक्सप्रेस),

सेट डिझाइन – डेरेक मॅकलेन (टू-टाईम टोनी पुरस्कार विजेते – मोलिन रूज!, MJ द म्युझिकल),

लाईट डिझाइन – जाफी वेइडमन,

साउंड डिझाइन – टोनी गेल,

व्हिडिओ डिझाइन – अखिला कृष्णन,

संगीत पर्यवेक्षण व संयोजन – टेड आर्थर,

संगीत संचालन – बेंजामिन होल्डर,

कास्टिंग – डेविड ग्राइंडरॉड CDG (ग्राइंडरॉड बर्टन कास्टिंग) द्वारे.


कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल ची वर्ल्ड प्रीमियर 2022 मध्ये द ओल्ड ग्लोब, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे झाली होती.


तिकीटं उपलब्ध आहेत: comefallinlovemusical.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.