मारूती सुझुकी प्रस्तुत 23 वे झी सिने अवॉर्ड्समध्ये 2025 च्या पर्पल कार्पेटवर भारतीय सिनेमामधील अग्रगण्य सिताऱ्यांनी सादर केले आपले जबरदस्त लूक्स
मुंबई, 17 मे 2025: आता प्रकाशाचा झोत पुन्हा एकदा भारतीय सिनेमाकडे वळला आहे – झी ने आकर्षक मारूती सुझुकी प्रस्तुत 23 वे झी सिने अवॉर्ड्स 2025 चे आयोजन करून भारतीय सिनेमामधील सितारे, कथा आणि चैतन्याला एकत्र आणत गेल्या वर्षासाठीचे भव्य सेलिब्रेशन साजरे केले. ह्यावर्षी मंच केवळ सिताऱ्यांसाठी राखीव नव्हता तर तो तेवढाच चाहत्यांसाठीही होता. सर्वांत मोठ्या फॅन्टरटेनमेंट नाईट ऑफ दि यरमध्ये ह्या संध्येमध्ये स्टारडम आणि फॅनडम यांचा रोमांचक संगम दिसून आला, ज्यामध्ये जे सिनेमा निर्माण करतात आणि जे त्याचा आनंद लुटतात असे सगळेच एका छताखाली ह्या जादूचा आनंद लुटण्यासाठी एकत्र आले. मुंबईच्या एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या, उच्चांक निर्माण करणाऱ्या आणि सिनेमाची जादू पुन्हा प्रस्थापित करणाऱ्या सिनेमॅटिक वर्षाला आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय सिनेमामधील सर्वांत उजळत्या सिताऱ्यांनी आयकॉनिक पर्पल कार्पेटवर पाऊल ठेवले आणि ह्या स्थळाला जणू स्वप्नवत जीवंत दृश्यामध्ये बदलून टाकले. फॅशन आणि फॅनडमचा मिलाफ झाला आणि येथील ग्लॅमर तर दैदिप्यमान होते. ताऱ्यांनी सजलेला हा भव्य सोहळा सौंदर्य आणि स्टाईलने भरलेला एक नेत्रदीपक अनुभव ठरला, जिथे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक से एक कलाकारांनी आपल्या सर्वोत्तम पोशाखात पर्पल कार्पेटवर हजेरी लावली. बॉलिवूडचा हार्टथ्रॉब कार्तिक आर्यन परिपूर्ण राखाडी सूटमध्ये टाईमलेस एलिगन्सचा प्रतीक वाटत होता, त्याच्या स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सुंदर अनन्या पांडेने सफेद साडीत सहज मोहकता साकारली, तर रश्मिका मंदाना काळ्या पोशाखात देखणी दिसत होती. तमन्ना भाटियाने देखील झगमगत्या काळ्या पोशाखात आत्मविश्वासाने झळकून झी सिने पुरस्कारांच्या पर्पल कार्पेटवर सहजतेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
टायगर श्रॉफ आणि अपारशक्ती खुराणा यांनी त्यांच्या देखण्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी परिधान केलेल्या स्टायलिश संपूर्ण काळ्या पोशाखाने त्यांच्या लूकला एक खास दर्जा मिळाला. तर शर्वरीने पूर्ण काळ्या बो गाउनमध्ये प्रत्येक पावलाला मोहकता आणि शाही थाट दाखवला. राशा थडानी सी ग्रीन साडीत अतिशय आकर्षक दिसत होती. तर जॅकलीन फर्नांडिस संपूर्ण काळ्या गाउनमध्ये तेजस्वी दिसत होती. वाणी कपूरने पिवळ्या आणि काळ्या झगमगत्या पोशाखात झळकत आपल्या ऊर्जा आणि उत्साहाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
विक्रांत मेस्सी ने सुद्धा काळ्या आकर्षक सूटमध्ये पारंपरिक सोज्वळपणा दाखवत आपल्या सहज करिष्मा आणि आकर्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लापता लेडीज’ टीम - रवी किशन, प्रतिभा रांता आणि नितांशी गोएल यांनी पर्पल कार्पेटवर चमकदार उपस्थिती नोंदवली, तर देखणी क्रिति सेनॉन झगमगत्या किरमिजी रंगाच्या गाउनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. तर गायक-संगीतकार जोडी सचिन आणि जिगर यांनी काळ्या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात पारंपरिक एलिगन्स दाखवला. सुनील शेट्टी हलक्या निळ्या स्ट्राईप सूटमध्ये देखणा दिसत होता, तर शनाया कपूर चमकदार रुपेरी साडीत मोहक दिसत होती. आणि अखेरीस लॉर्ड बॉबी म्हणजेच बॉबी देओल पांढऱ्या सूटमध्ये उठून दिसत होता आणि त्याच्या स्टायलिश उपस्थितीने पर्पल कार्पेटवर एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले. एकूणच या सर्व सिताऱ्यांनी त्यांच्या अप्रतिम स्टाईलने पर्पल कार्पेटवर तेज निर्माण केले आणि सौंदर्य व गौरवाने भरलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ घडवली.
पुरस्कार संध्या तर ब्लॉकबस्टर परफॉर्मन्सेस, भावुक करणारे क्षण आणि ईलेक्ट्रिफाईंग ऊर्जा यांसोबत जणू एखाद्या सिनेमॅटिक मास्टरपिससारखी अचूकपणे उलगडत गेली. कार्तिक आर्यनने आपल्या भूल भुलैय्या स्वॅगसोबत धमाल केली तर अनन्या पांडेने हाय–ऑक्टेन ग्लॅम–पॉप गीत सादर केले, रश्मिका मंदानाच्या सुंदर हास्याने मंचावर छान वातावरण निर्माण केले, तमन्ना भाटियाने आपल्या दिलखेचक अदाकारीसह मंचाला अक्षरशः आग लावली आणि टायगर श्रॉफने आपल्या ट्रेडमार्क स्टंट्स आणि सहज डान्स मूव्ह्ससह सर्वांचे मनोरंजन केले आणि. शर्वरी, राशा थडानी, जॅकलिन फर्नांडेज आणि वाणी कपूर यांच्या सळसळत्या परफॉर्मन्सेससह मंचावरील ऊर्जा गगनाला भिडली होती. ह्या संध्येमध्ये आपले अचूक, विनोदी आणि जबरदस्त पंचेससह विक्रांत मास्सी, अपारशक्ती खुराणा आणि रवि किशन यांनी ह्या संध्येचे अप्रतिम सूत्रसंचालन करत ह्या एक से एक परफॉर्मन्सेसच्या दरम्यान प्रेक्षकांचे मस्त मनोरंजन केले.
पण ह्या सगळ्या टाळ्या आणि परफॉर्मन्सेसच्या पलीकडे ह्या संध्येच्या केंद्रस्थानी होती ओळख – ते पुरस्कार चषक, ज्यांनी सर्व प्रकारांमधील, सर्व पिढ्यांमधील आणि सर्व भौगोलिक क्षेत्रांमधील सर्वोत्तमता साजरी केली. ताकदीचे कलाकार ते नवीन उदयास येत असलेले कथाकार, ख्यातनाम तंत्रज्ञांपासून दूरदर्शी दिग्दर्शकांपर्यंत – 23 वे झी सिने अॅवॉर्ड्स 2025 ने सिनेमाला जीवंत करणाऱ्या सर्वांचा सन्मान केला. ह्यावर्षी ह्या सेलिबे्रशनमध्ये स्क्रीनसमोर बसणाऱ्या प्रेक्षकांच्या योगदानाला ओळखले. अविस्मरणीय फॅन क्षण, सद्गदित करणाऱ्या श्रद्धांजली आणि एकमेकांसोबत वाटून घेतलेले आनंद यांसह ही संध्या केवळ एका पुरस्कार संध्येपेक्षा कितीतरी अधिक बनली. सिनेमा जे काही आहे त्यासाठी ही एक एकत्रित आदरांजली होती.
पहा ही जादू केवळ मारूती सुझुकी प्रस्तुत 23 वे झी सिने अॅवॉर्ड्स 2025 को–पॉवर्ड बाय माझा, ट्रेसेमे, विक्स कफ ड्रॉप्स, गो चीज आणि डाबर रेड पेस्ट, एनर्जी ड्रिंक भागीदार – हेल एनर्जी, स्पेशल भागीदार – बालाजी वेफर्स, कॅडबरी डेअरी मिल्क, डॉक्टर फिक्सिट आणि गार्निएर फक्त झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी5 वर.