“जर मी ऑन-स्क्रीन चहावाला बनत असेन, तर ऑफ-स्क्रीन का नाही!” – अभिषेक मलिकचा ‘जमाई नं. 1’साठीचा टपरी क्षण!
झी टीव्हीवरील ‘जमाई नं. 1’मध्ये एक भावस्पर्शी ट्विस्ट पाहायला मिळाला जेव्हा नील (अभिषेक मलिक) आपल्या ऑन-स्क्रीन पत्नी रिद्धी (सिमरन कौर) ला प्रभावित करण्यासाठी चहावाल्याच्या रूपात समोर आला. एका खास आणि जुनी आठवण जागी करण्यासाठी नील रिद्धीला एका ‘टपरी डेट’वर घेऊन जातो, जिथे तो चहावाला बनून तिला चहा सर्व्ह करतो. यात एक साधा वाटणारा चहा त्याने प्रेम आणि आठवणींचे प्रतीक बनवला. पण जे खरे खास होते, ते पडद्यामागे घडले!
अभिषेक मलिकने या भूमिकेत स्वतःला इतके गुंतवले की केवळ अभिनयापुरता चहावाला न राहता, शूटिंगदरम्यान खऱ्या आयुष्यातही तो सेटवरील कलाकार व कर्मचाऱ्यांसाठी चहा बनवू लागला! याआधी कधीही चहा न बनवलेल्या अभिषेकने स्पॉटबॉय आणि किचन टीमच्या मदतीने चहा बनवण्याची कला शिकली आणि मग शॉट्सच्या ब्रेकमध्ये सर्वांना चहा सर्व्ह करण्याचा मोह त्याला आवरला नाही.
अभिषेक म्हणाला, “हा ट्रॅक खरंच खूप मजेदार होता. जेव्हा मी ही संकल्पना ऐकली तेव्हाच खूप उत्साही झालो होतो — हे प्रेम व्यक्त करण्याचे एक खूप गोड आणि छान माध्यम होते. मी ठरवले, की जर मी ऑन-स्क्रीन चहावाला बनतोय, तर ऑफ-स्क्रीन का नाही! मला चहा बनवायचे काहीही ज्ञान नव्हते, पण क्रू ने मला खूप मदत केली. मी पटकन शिकलो आणि मग माझ्या ऑन-स्क्रीन कुटुंबासोबतच सेटवरच्या सगळ्यांना चहा दिला — बरोबर आलं, वेलची आणि लवंग घालून! मला खरंच त्या क्लासिक कटिंग चहा टपरीचा फील द्यायचा होता. अजूनही माहित नाही की मी परफेक्ट बनवलाय की नाही, पण सगळ्यांनी खूप प्रोत्साहन दिले. हे एक छोटेसे चहा सेशनच बनले आणि सगळ्यांमध्ये एक आनंददायक वातावरण निर्माण झाले. अगदी जे लोक चहा प्यायचे नाहीत, त्यांनीही ट्राय केला. असे क्षण आठवण करून देतात की हे काम किती मजेदार असू शकते.”
अभिषेक मलिकची ही अचानक सुरू झालेली चहा सर्व्हिंग मालिका आणि त्याची ऊर्जा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन आली, तसेच मालिकेतील आगामी ट्रॅक एक नाट्यमय वळण घेणार आहे. सायली (सोनल वेंगुर्लेकर) रिद्धी आणि नील यांच्यात गैरसमज निर्माण करून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिच्या युक्त्या यशस्वी होतील का? की प्रेम शेवटी विजय मिळवेल?
हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘जमाई नं. 1’, दररोज रात्री 11:00 वाजता, फक्त झी टीव्हीवर!